Wednesday, October 5, 2022

Buy now

भर अधिवेशनात गिरीश महाजनांची लागली डुलकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास दि. ३ मार्चपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्यांवरून खंडाजगी होत आहार. दरम्यान अधिवेशात मंगळवारी चक्क भाजपच्या एका आमदाराची डुलकी लागल्याचे दिसून आले.

गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. मंगळवारी अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सभागृहाला संभोधित करत होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागे भाजप आमदार आशिष शेलार व गिरीश महाजन बसलेले होते. यावेळी पुढे देवेंद्र फडणवीस बोलत असताना पाठीमागे बसलेल्या आमदार महाजन यांना आदिवेशन कामकाज सुरु आहे हेही कळाले नाही. त्यांची अधूनमधून डुलकी लागत होती.

गिरीश महाजन हे वारंवार झोपत असल्याने त्याची हि गोधत लक्षात येताच त्याच्या शेजारी बसलेले आमदार आशिष शेलार यांच्याकडून त्यांना झोपेतून उठवण्याचा प्रयत्नही केला गेला. या प्रकारामुळे उपस्थितांच्यात चर्चा रंगली होती.