औरंगाबाद : शहारात चोरीचे सत्र सुरुच असून वेगवेगळ्या भागात छोट्या मोठया चोरीचे सत्र समोर येत आहेत. यात फोनवर बोलत असताना तरुणाचा मोबाईल चोरल्याचा प्रकार आठ दिवसांपूर्वी जवाहरलाल परिसरात घडला होता. या घटनेची पुनरवृत्ती झाल्याच समोर आले आहे. रस्त्यावर उभे राहून कॉलवर बोलत असताना तरुणाचा मोबाईल चोरट्यानी दुचाकीवरून हिसाकावून नेला.
जय टॉवर जवळील प्राची अपार्टमेंट मध्ये राहणारा भगवान दिगंबर दुधाटे ( वय 22) हा तरुण कामावरून घरी पायी जात होता. यावेळी कीज हॉटेल समोरून जात असताना कोकणवाडी चौकातून वेगात येणाऱ्या ट्रिपलसीट दुचाकीस्वारांनी भगवानच्या हातात असलेला मोबाईल हिसकावला आणि ते तिघे रेल्वे स्टेशनच्या दिशेने पसार झाले.
या घटनेनंतर भगवानने वेदांत नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली. त्यावरून उपनिरीक्षक प्रमोद देवकते यांनी गुन्हा नोंद केला आहे. त्याचबरोबर शहरात अशाच पद्धतीने मंगळसूत्र चोरट्यांच्या घटना वाढत आहेत. कॉलनी आणि मुख्य रस्त्यावर जाणाऱ्या महिलांना खास करून टार्गेट केलं जात आहे.