कुटूंब घरात असताना पत्रे ठोकून घरं केली सील; बेंगळुरू महानगरपालिकेच्या अतिउत्साही कारवाईवर लोकांकडून टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाचे मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक आहे. मोठ्या प्रमाणात सापडत असलेली रुग्णसंख्या कमी होण्यासाठी अनेक ठिकाणी लॉकडाउन घोषित केले आहे. ज्या भागात रुग्ण सापडत आहेत, तशी अनेक ठिकाण सुरक्षेच्या दृष्टीने सील करण्यात येत आहेत. परंतु कुटुंबातील लोक राहत होती याची खातरजमा न करता घर सील करण्यात येत आहेत त्यामुळे प्रशासनावर टीका केली जात आहे.

बेंगळुरू भागात हि कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. बंगळुरु प्रशासन सध्या करोनाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चिंतेत आहे. जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन गुरुवारी संपला आहे. त्यादरम्यान काही भागत कोरोना पेशन्ट सापडल्याने तेथील दोन घर सील करण्यात आली आणि त्यासाठी महानगर पालिकेकडून बाहेरून पत्रे ठोकून घर सील केली परंतु आत कुटुंब आहे हि खातरजमा केली नाही त्यामुळे महानगरपालिकेच्या अतिउत्साह कारभारावर टीका केली जात आहे. या घरांमध्ये एक महिला, दोन लहान मुलं आणि वृद्ध नागरिक वास्तव्यास होते.

 

बेंगळुरू महापालिका आयुक्त एन मंजुनाथ प्रसाद यांनी महापालिका कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या कारवाईबद्दल माफी मागत तात्काळ पत्रे हटवण्याचा आदेश दिला. एन मंजुनाथ प्रसाद यांनी ट्विट करत सांगितलं आहे की, “ तेथील बॅरिकेड्स लगेच हटवले जातील याची काळजी मी घेतली आहे. सर्वांना आदराने वागणूक दिली जाईल. तसेच संसर्ग झालेल्यांचं संरक्षण करणं आणि न झालेल्यांना सुरक्षा देणं हा आमचा हेतू आहे”.गुरुवारी कर्नाटकात ५००० करोनाबाधित रुग्ण आढळले तर ९७ मृत्यू झाले. त्यामुळे तेथील येडियुरप्पा सरकारने ५५ वयावरील लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

Leave a Comment