कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील
सुधारित परिक्षा योजना व अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासाठी पुण्यात मोठे आंदोलन विद्यार्थ्यांकडून उभारण्यात आले, गेल्या चार दिवसांपासून हे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला महाविकास आघाडीचा पाठिंबा होता. परंतु या सर्वामध्ये चर्चेत चेहरा म्हणजे महाराष्ट्र युवक काॅंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे हा राहिला. एमपीएससीच्या विद्यार्थ्यासाठी गेल्या चार दिवासापासून रस्त्यावर उतरलेल्या या नेतृत्वाचा विद्यार्थ्यांनी यश मिळाल्यानंतर खांद्यावर घेवून हार करून सत्कार केला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे गेल्या 7 महिन्यापासून विद्यार्थी पाठपुरावा करत होते. गेल्या चार दिवसापासून पुण्यात आंदोलनही सुरू करण्यात आले. बुधवारी रात्री 11 वाजता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विद्यार्थ्यांची भेट घेवून चर्चाही केली. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी आंदोलन पाठीमागे घेतल्याचे सांगितले. अशावेळी शिवराज मोरे व उपस्थित विद्यार्थ्यांनी अंतिम तोडगा निघाल्याशिवाय माघार नाही, असे सांगितले होते.
शिवराज मोरे यांनी सलग 82 तास या आमरण उपोषणात सहभाग घेतला. आंदोलनस्थळी शरद पवार यांनी भेट घेतल्यानंतर त्यांनी त्याचे आदरपूर्वक भूमिकेचे स्वागत केले होते. परंतु आता आर या पारची लढाई म्हणत, यश मिळाल्याशिवाय माघार नाही अशी भुमिका घेतली होती. अखेर गुरूवारी 5 वाजून 10 मिनिटांनी लोकसेवा आयोगाने ट्विट करत विद्यार्थ्यांची मागणी केली. तेव्हा विद्यार्थ्यांनी जल्लोष केला, यावेळी कराडचे सुपूत्र असलेले व विद्यार्थ्यासाठी सतत काम करणारे युवक काॅंग्रेसचे शिवराज मोरे हा चेहरा या यशामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात चर्चेत आला आहे.
आ. सत्यजित तांबे अन् शिवराज मोरे जोडी
युवक काॅंग्रेसमध्ये खांद्याला खांदा लावून काम करणारे आ. सत्यजित तांबे आणि शिवराज मोरे ही युवा जोडी नेहमीच पहायला मिळाली आहे. त्यामुळेच पुण्यात उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सत्यजित तांबे यांनी हजेरी लावली होती. आता काॅंग्रेसच्या शिवराज मोरेंमुळे विद्यार्थ्यांना एक आश्वासक चेहरा पहायला मिळाला आहे. महाराष्ट्रात सध्या सत्यजित तांबे यांनी अपक्ष राहण्याची भुमिका घेतल्याने काॅंग्रेस पक्षात राजकारणातील जाणकार व तळागाळापर्यंत यंत्रणा राबविणारे, माजी मुख्यमंत्री व काॅंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या तालमीत तयार होणारे तरूण नेतृत्व म्हणजे शिवराज मोरे असून आता काॅंग्रेसने त्याच्यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. सध्या राजकारणात पुण्यातील यशस्वी आंदोलनातील तरूण चेहरा असलेला शिवराज मोरे कोण आहे, याची उत्सुकता विद्यार्थी नव्हे आता राजकारणातील जाणकरांना लागली आहे.