प्रभास, राम चरण आणि ज्युनियर एनटीआर मधील आवडता हिरो कोण ? राजामौली यांनी उघडपणे केलं ‘या’ अभिनेत्याचे कौतुक

नवी दिल्ली । बाहुबलीनंतर, देशभरातील लोकं आता राजामौली यांच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत, मात्र कोविड-19 च्या वाढत्या उद्रेकामुळे, त्याच्या रिलीजची डेट पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट आधी 7 जानेवारी 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार होता, मात्र आता त्याच्या रिलीजची नवीन तारीख समोर आली आहे. रिलीज होण्यात उशिर होत असल्यामुळे त्यांचे चाहते निराश झाले आहेत, मात्र निर्मात्यांच्या मते या चित्रपटासाठी देखील लोकांचा तोच उत्साह दिसून येतो आहे जो बाहुबलीसाठी होता.

मात्र, येथे आम्ही तुम्हाला ‘RRR’ चा लीड अ‍ॅक्टर राम चरणबद्दल राजामौली यांनी केलेल्या कौतुकांबद्दल सांगणार आहोत, या अभिनेत्याने यापूर्वी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत, त्यापैकीच एक असलेला मगधीरा हा चित्रपट देशभरातील लोकांना आवडला आहे. राजामौली यांना विशेषतः राम चरण फार आवडतो आणि त्यांनी अनेक प्रसंगी त्याची प्रशंसा देखील केली आहे.

आपल्या या आवडत्या हिरोचे कौतुक करताना राजामौली यांनी सांगितलेले काही कोट्स मायक्रो-ब्लॉगिंग साइट- ट्विटरवर व्हायरल होत आहेत. त्यापैकीच काही खाली दिले आहेत.
1. ‘मला राम भीमापेक्षा थोडा जास्त आवडतो’
2. ‘राम चरणचा इनसेन स्क्रीन प्रेझेन्स’
3. ‘राम चरण माझा हीरो आहे; मी त्याच्याकडून खूप काही शिकलो’
4. ‘RRR’ मधला राम चरणचा इंट्रो शॉट माझ्या संपूर्ण कारकिर्दीतील सर्वोत्तम शॉट आहे’
5. ‘डेमी गॉड अल्लुरीच्या भूमिकेत राम चरणची उपस्थिती, तुम्ही वर्णन केलेल्या कोणत्याही पात्रात तो सहजपणे फिट होतो’

RRR या दोन तारखांना होऊ शकतो रिलीज
एसएस राजामौली हे मेगा पॉवर स्टारचे नेहमीच कौतुक करतात. ट्विटरवर व्हायरल होत असलेले हे कोट्स अनेक मुलाखती आणि लॉन्च इव्हेंटमधून काढले गेले आहेत, जे स्पष्टपणे सिद्ध करतात की, राजामौली यांना राम चरण खूप आवडतो. ‘RRR’ आता एकतर 18 मार्च किंवा 28 एप्रिल 2022 रोजी रिलीज होणार आहे, तिसरी लाट किती लवकर जाते आणि सामान्यता टिकते यावर ते अवलंबून आहे. कोरोनाचे रुग्ण कमी होताच सर्व चित्रपटगृहे उघडतील आणि चित्रपट प्रदर्शित होईल.