WHO ने म्हटले आहे की,”कोरोनाविरूद्ध आतापर्यंत कोणतीही लस 50 टक्के देखील प्रभावी ठरली नाही, आपल्याला आणखी वाट पाहावी लागेल”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस साथीच्या भीतीमुळे अजूनही जगाला त्रास होतो आहे. याचा शेवट करण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक प्रभावी लस तयार करण्याचे काम करत आहेत. परंतु ही लस किती वेळात येईल आणि कोरोना संसर्गापासून लोकांना दिलासा मिळेल हे अजूनही कळू शकलेले नाही. रशिया आणि चीनसारख्या देशांमध्ये ही लस तिसर्‍या टप्प्यातील चाचणीशिवाय दिली जात आहे. त्याचबरोबर, WHO ने देखील जगभरात पसरलेल्या या संसर्गाबद्दल अनेक वेळा चिंता व्यक्त केली आहे. एयू मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांच्या या लसीबाबतच्या विधानाने लोकांची चिंता वाढविली आहे. वास्तविक, त्यांनी असे म्हटले आहे की, 2022 पूर्वी पुरेश्या प्रमाणात लस येणे अवघड आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा लोकांच्या कपाळावर चिंतेच्या ओघा दिसू लागल्या आहेत आणि लोक या साथीच्या भीतीपोटी आणखी किती काळ जगायला भाग पडेल असा प्रश्न उपस्थित होत आहे.

2021 पर्यंत सुमारे दोन अब्ज डोसचे लक्ष्य
पुढच्या वर्षीच्या सुरूवातीला ही लस जगभरात मिळू शकणार नाही, असे या शास्त्रज्ञाने सांगितले. याचे कारण म्हणजे 2021 च्या सुरूवातीस, लसीचे प्रभावी परिणाम दिसू लागतील आणि त्यानंतरच त्याच्या वितरणाविषयी निर्णय घेता येईल. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या कोवाक्स योजनेंतर्गत वेगवेगळ्या देशातील लोकांना समान लस देण्याचे काम केले जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र, यासाठी पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत ही लस मोठ्या प्रमाणात तयार करावी लागेल, जेणेकरुन याचे डोस लाखो लोकांना दिले जातील. त्याअंतर्गत 2021 च्या अखेरीस दोन अब्ज डोस लसी मिळण्याचे लक्ष्य असेल.

लस 50 टक्के देखील प्रभावी नाही
विशेष म्हणजे, जागतिक आरोग्य संघटनेने याआधीच हे स्पष्ट केले आहे की, त्याच्या निकषांनुसार, क्लिनिकल चाचण्यांच्या प्रगतीच्या टप्प्यात पोहोचलेली कोणतीही लस कोरोना विषाणू विरूद्ध 50 टक्के प्रभावी नाही आहे. त्याच वेळी, संस्थेच्या प्रवक्त्या मार्गारेट हॅरिसच्या म्हणण्यानुसार, अशी कोणतीही लस आतापर्यंत प्रभावी ठरलेली नाही.

मार्गदर्शक सूचना देण्यात येतील
त्यांचे असे म्हणणे आहे की,’ या लसींची चाचणी किमान एक वर्ष घेईल, कारण या लसीचे लोकांवर होणारे परिणाम आणि त्याचे दुष्परिणाम या काळात दिसून येतील. जेणेकरून लोकांना योग्य लस मिळेल, जी त्यांना या साथीच्या आजारापासून वाचवू शकतील. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की,’ अमेरिकेचे अन्न व औषध प्रशासन लवकरच या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी आवश्यक असलेल्या मार्गदर्शक सूचना जारी करेल.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment