WHO च्या तांत्रिक सल्लागार गटाने Covaxin च्या आपत्कालीन वापराची शिफारस केली – सूत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक सल्लागार गटाने भारतात बनवलेली अँटी-कोरोनाव्हायरस लस Covaxin ला आपत्कालीन वापरासाठी जवळजवळ मान्यता दिली आहे. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, WHO च्या तांत्रिक सल्लागार गटाने आपत्कालीन वापराच्या लिस्टमध्ये भारत बायोटेकच्या अँटी-कोविड-19 लस, Covaxin ची शिफारस केली आहे. सुत्रांनी माहिती दिली आहे की,’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अ‍ॅड्रेनॉम गेब्रेयसस यांना लसीच्या आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी विशेष शिफारस केली होती.’

लस विकसित करणार्‍या हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीने 19 एप्रिल रोजी WHO ला इमर्जन्सी यूज लिस्ट (EUL) मध्ये लस समाविष्ट करण्यासाठी EOI सादर केला. तेव्हापासून जागतिक आरोग्य संघटनेला महत्त्वाच्या बैठकांच्या अनेक फेऱ्यांनंतर या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यात यश आले आहे. या गटाने 26 ऑक्टोबरच्या बैठकीत भारत-बायोटेककडून अतिरिक्त डेटा मागवला होता जेणेकरून अंतिम विश्लेषण करता येईल. या मागवलेल्या अतिरिक्त डेटामध्ये 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या इम्युनोजेनिसिटी डेटाचा समावेश होता. याशिवाय लिंगानुसारही डेटाची मागणी करण्यात आली होती. तांत्रिक सल्लागार गटाच्या मागणीनुसार भारत बायोटेकने गेल्या आठवड्यात हा डेटा सबमिट केला.

तांत्रिक सल्लागार गटाला कोणत्याही लसीला आपत्कालीन वापराचे लायसन्स देण्याचे अधिकार आहेत. यापूर्वी सोमवारी ऑस्ट्रेलियन सरकारने Covaxin ला प्रवासासाठी परवानगी दिली आहे. ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त बॅरी ओ’फेरेल यांनी ही माहिती दिली. नवीन परवानगीनंतर, ज्या भारतीयांना लस मिळाली आहे त्यांना परवानगी मिळेल. Covishield ने ऑस्ट्रेलियात आधीच परवानगी मिळवली आहे.

WHO ने आतापर्यंत जगातील सात कोरोना लसींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. संस्थेच्या स्ट्रेटजिक एडवायजरी ग्रुपने यापूर्वीच या लसीचे विश्लेषण केले आहे. गेल्या आठवड्यात, देशाचे आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी देखील सांगितले होते -“WHO कडे एक सिस्टीम आहे ज्यामध्ये एक तांत्रिक समिती आहे जे लस मंजूर करतात.”

Leave a Comment