किचनमधील ‘हा’ पांढरा पदार्थ दरवर्षी घेतोय 19 लाख प्राण ! WHO ने दिला धोक्याचा इशारा

0
5
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आपण जे खातो त्याप्रमाणे आपली शारीरिक प्रकृती असते. जर आपण चांगलं अन्न खाल्लं तर आपलं शरीर चांगलं राहतं. त्याचप्रमाणे जर कोणताही पदार्थ अति प्रमाणात आपल्या शरीरात गेला तर त्याचे नुकसान शरीरासाठी ठरलेले आहे. आपल्या किचनमध्ये अनेक असे पदार्थ आहेत जे जास्त खाणं नेहमी शरीरासाठी धोक्याचं असतं जसं की साखर आणि प्रत्येक जेवणाची चव वाढवणार मीठ…

मीठ जर तुम्ही जास्त प्रमाणात सेवन केलं तर ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकत. जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO ने याबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओ च्या मते जगभरात दरवर्षी जास्त प्रमाणात मिठाचे सेवन केल्यामुळे तब्बल 19 लाख व्यक्तींचा मृत्यू होत आहे. डब्ल्यूएचओ च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सोडियमचा वापर कमी करण्यासाठी पोटॅशियम युक्त मीठ खाण्याचा सल्ला देखील देण्यात आला त्यामुळे उच्च रक्तदाब हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.

पोटॅशियम युक्त मीठ खाण्याचा सल्ला

जास्त प्रमाणात मिठाचे सेवन केल्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि स्ट्रोक होतो. हे तीन आजार अचानक होणाऱ्या मृत्यूची सर्वात मोठी कारण आहेत. डब्ल्यूएचओ ने नवीन मार्गदर्शक तत्व जारी केली आहे. ज्यामध्ये लोकांना निरोगी पर्याय म्हणून पोटॅशियमयुक्त मीठ खाण्याचे आवाहन देखील केले आहे.
डब्ल्यूएचओनं दिलेल्या रिपोर्टनुसार तर वर्षी जगभरात 19 लाख मृत्यू जास्त प्रमाणात मीठ सेवन केल्यामुळे होतं. एका व्यक्तीने दिवसाला दोन ग्रॅम पेक्षा जास्त मीठ सेवन करू नये. परंतु बहुतेक लोक दररोज 4.3 ग्रॅम पेक्षा जास्त मीठ वापरतात. पोटॅशियम युक्त नीट खाण्याचा सल्ला दिलाय जो कमी सोडियमयुक्त पर्याय आहे. यामध्ये काही सोडियम क्लोराइड पोटॅशियम क्लोराईड ने बदललं जातं. या बदलामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते अचानक होणारा मृत्यूचा धोका देखील कमी होतो.

हृदय आणि स्नायूंच्या कार्यात पोटॅशियम महत्त्वाची भूमिका बजावत असतात. परंतु लोक पुरेसं सेवन पोटॅशियमचं करत नाहीत डब्ल्यूएचओ च्या मध्ये दररोज 3.5 ग्रॅम पोटॅशियम सेवन केलं पाहिजे. पोटॅशियम युक्त मीट सेवन केल्यामुळे तुमच्या हृदयाचा आरोग्य देखील सुधारू शकत.