हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे देशातील सर्वात पॉवरफुल नेते मानले जातात. २०१४ पासून ते आजपर्यंत म्हणजेच जवळपास १५ वर्ष मोदी देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत कायम राहणार आहे. देशात मोदींना आव्हान देईल असा त्यांच्या तोडीचा एकही नेता भाजपमध्येही नाही आणि विरोधी पक्षातही नाही. परंतु सध्या मोदींचे वय ७३ असून २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत त्यांचं वय ७८ वर्ष होईल. अशावेळी सत्ता आल्यास ते पुन्हा चौथ्यांदा पंतप्रधान होणार कि आपला उत्तराधिकारी म्हणून पक्षातील दुसऱ्या कोणत्या तरी नेत्याच्या गळ्यात पंतप्रधान पदाची माळ टाकणार? हे बघायला हवं. भाजपमध्ये अमित शाह (Amit Shah), राजनाथ सिंह (Rajnath Singh) , योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath), नितीन गडकरी (Nitin Gadkari) असे एक से बढकर एक नेते आहेत. मात्र जनता मोदीनंतर कोणाला स्वीकारेल हा प्रश्नच आहे. याच पार्श्वभूमीवर मूड ऑफ द नेशन 2024 सर्वेक्षणात, इंडिया टुडेने नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधान म्हणून कोणाला पाहायचे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये सर्वाधिक लोकांनी अमित शहा यांना पसंती दर्शवली आहे.
कोणाला किती टक्के समर्थन-
मूड ऑफ द नेशन 2024 (Mood Of Nation 2024) च्या सर्वेक्षणात 25 टक्क्यांहून अधिक लोकांनी अमित शहा यांना मोदींचे उत्तराधिकारी मानले आणि मोदी नंतर अमित शहा यांनाच पंतप्रधान पदासाठी आपली पसंती दर्शवली. यानंतर दुसरा नंबर लागला तो म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा… आदित्यनाथ यांनाही पंतप्रधान पदासाठी 19 टक्के लोकांचा पाठिंबा मिळाला. यात तिसरं नाव आले ते विकासपुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नितीन गडकरी यांचे… . 13 टक्के लोकांना असं वाटतं कि नरेंद्र मोदीनंतर नितीन गडकरी देशाचे पंतप्रधान व्हावेत.
शिवराज सिंह आणि राजनाथ सिंह देखील शर्यतीत
अमित शहा, योगी आदित्यनाथ आणि नितीन गडकरी यांच्याशिवाय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान हे सुद्धा मोदींच्या उत्तराधिकारीच्या शैर्यतीत आहेत. 5 टक्के लोकांनी शिवराज सिंह चौहान याना आणि 5 टक्के लोकांनी राजनाथ सिंह याना पंतप्रधान पदासाठी पसंती दिली आहे. गेल्या दोन सर्व्हेंच्या तुलनेत जर बघीतल तर राजनाथ सिंह यांना जनतेचे समर्थन वाढल्याचे पाहायला मिळाले आहे. तर योगी आदित्यनाथ यांची पसंती घटल्याचे दिसत आहे.