अमित देशमुखांना लातूर शहर मतदारसंघात भाजप यंदा मात देईल का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमित देशमुख (Amit Deshmukh) विरुद्ध कोण? हा प्रश्न विचारण्याची वेळ आलीय… कारण लातूर शहर विधानसभा मतदारसंघात देशमुखांची घोडदौड रोखण्यासाठी भाजपने अनेक प्लॅन केल्यानंतर आता एक नवा कोरा चेहरा मैदानात उतरवण्याचा डाव भाजप टाकू पाहतोय… विलासराव देशमुखांची खऱ्या अर्थाने लेगसी कुणी चालवली असेल तर ती अमित देशमुखांनीच… तब्बल 15 वर्ष आमदार राहिलेल्या अमित देशमुखांनी लोकसभेलाही काँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी भरभक्कम लीड देऊन लातूरात फक्त देशमुख पॅटर्नच चालतो, हे पुन्हा एकदा दाखवून दिलय… पण राजकारण विरोधात असलं तरी भाजपने देशमुखांना खिंडीत गाठण्यासाठी एक नवा चेहरा विधानसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केलीये… पण या चेहऱ्यात लातूरातील देशमुख नावाच्या ब्रँडला चितपट करण्याइतपत धमक आहे का? अमित देशमुखांसाठी यंदाच्या विधानसभेला प्लस-मायनस काय काय असणार आहे? आणि लातूर शहर या विधानसभेचा गेलाबाजार इंटरेस्टिंग इतिहास नेमका आहे तरी काय? त्याचाच घेतलेला हा आढावा…

विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीधर्मातून लातूर शहरातील भाजप कमजोर राहिली… 1995 चा अपवाद वगळता 1980 ते 2009 सलग पाच टर्म विलासरावांनी याच मतदारसंघात निर्विवाद वर्चस्व गाजवलं… लातूर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या प्रेमापोटीच मुख्यमंत्री होण्याचा मान विलासरावांना अनुभवता आला… पण 2009 ला नव्यानं मतदारसंघ तयार झाल्यानं… आणि विलासराव दिल्लीतल्या राजकारणात ॲक्टिव्ह झाल्यामुळे अमित देशमुखांचं लातूर शहर मतदारसंघातून पॉलिटिकल लॉन्चिंग झालं… 2009, 2014, 2019 अशा सलग तिन्ही निवडणुकीत अमित देशमुखांनी मोठ्या लीडने दणक्यात विजय मिळवला… मुळात अमित देशमुख हे फक्त एका मतदारसंघाचे नाही…तर संपूर्ण जिल्ह्यावर कंट्रोल ठेवणारा काँग्रेसचा चेहरा असल्यानं ते शहरातून आरामात निवडून येतात… या तिन्ही निवडणुकी वेळेस भाजपचे शैलेश लाहोटी यांनी त्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला… पण तिन्ही वेळेस काही मोजकी मतं वगळता देशमुखांना त्यांना मानवी अशी तगडी फाईट देता आलेली नाहीये…

YouTube video player

त्यात 2014, 2019 या दोन्ही वेळेस लातूरात लोकसभेला भाजपच्या बाजूने वार असतानाही विधानसभेला मात्र अमित देशमुखांना नो चॅलेंज अशी परिस्थिती होती… म्हणजे वाईट काळ असला तरी, लातूरकरांनी नेहमीच विलासरावानंतर अमितभैयांवर विश्वास ठेवला…त्यांना प्रेम दिल… आता तर वार पक्क काँग्रेसच्या बाजूने आहे… सलग १० वर्ष भाजपकडे राहिलेली खासदारकी अमित देशमुखांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा काँग्रेसकडे खेचून आणण्यात नुकतच यश मिळाल आहे… अमित भैय्यांच्या मतदारसंघाने…म्हणजेच एकट्या लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक 30 हजार मतांचं लीड काँग्रेसच्या डॉ. शिवाजी काळगे यांच्या पाठीशी राहिल्याने अमित देशमुख यंदाही आरामात आमदारकीचा चौकार मारतील, अशी परिस्थिती सध्या मतदार संघात आहे…

विद्यमान आमदारांच्या प्लस-मायनस चा विचार करायचा झाला तर विकासाच्या राजकारणावर दिलेला जोर, विलासराव देशमुखांची लेगसी, एमआयडीसी आणि रेल्वेची केलेली कामे हे सगळं अमित देशमुखांना प्लसमध्ये घेऊन जातं… तर शहरातील पाण्याचा रखडलेला प्रश्न, महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा विकासाचा आराखडा मंजूर नसणं हे देशमुखांना येत्या निवडणुकीत मायनस मध्ये घेऊन जाऊ शकतात, असं म्हणता येऊ शकतं…शहरात मुस्लिम दलित व मराठा समाजाचे मतदान हे कायम काँग्रेसला होत असतं, तसेच यंदा लिंगायत समाजाचे खासदार निवडून गेल्याने यावेळी लिंगायत समाजाचा पाठिंबा देखील काँग्रेसच्याच बाजूने राहू शकतो…मागच्या तीनही वेळेस टक्कर देणारे पारंपारिक प्रतिस्पर्धी शैलेश लाहोटी यांच्या ऐवजी मात्र भाजप नवा चेहरा अमित देशमुखांच्या विरोधात मैदानात उतरवण्याचा विचार करू पाहते आहे… माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर यांचे सुपुत्र अजित पाटील कव्हेकर यांचं नाव देशमुखांच्या विरोधात कन्फर्म समजलं जातंय… पण चेहरा बदलला म्हणून देशमुखांची मतदार संघातील क्रेझ संपेल, असं म्हणता येऊ शकतं नाही… म्हणजेच काय तर सध्यातरी सगळ्याच अंगांनी अमित देशमुख यांची आमदारकी सेफ झोन मध्ये दिसतेय…

सोयाबीनचं तुरीचं कोठार म्हणून लातूरची ओळख… विलासराव देशमुख शिवाजीराव पाटील हे दोन मुख्यमंत्री या जिल्ह्याने राज्याला दिले… त्यामुळे त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातून राजकारणाची गंगा लातूर कडे शिफ्ट केली… शहरासाठी विकासाचं मॉडेल मांडलं… हेच व्हिजन अमित देशमुखही पुढे घेऊन जात असल्याने भाजपला इथं आपला जम बसवण्यासाठी एक्सट्रा एफर्ट घ्यावे लागणार आहेत… अजित पाटील कव्हेकर हे कुठल्या मुद्द्यांना घेऊन देशमुखांच्या विरोधात मैदानात उतरतील? 15 वर्षातील रखडलेल्या कुठल्या कामांकडे बोट दाखवून सपोर्ट आपल्या बाजूने खेचून घेतील? यावरही इथली बरीचशी समीकरण अवलंबून असणार आहेत…नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीशी सारी यंत्रणा ही देशमुखांनीच लावली होती…याच लातूर शहर आणि ग्रामीण मतदार संघातून त्यांनी निर्णायक लीड हे काळगेंच्या पाठीशी दिलं… लोकसभेतला पराभव भाजपाच्या जिव्हारी लागलेला असणार, यात शंकाच नाही… त्यामुळे आता याचा वचपा काढण्यासाठी अमित देशमुखांच्या विरोधात विधानसभेला कशी खेळी खेळणार हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे…