मांजरेकरांच्या आगामी चित्रपटात कोण साकारणार सावरकरांची भूमिका..?; या अभिनेत्यांची नावं चर्चेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लवकरच रूपेरी पडद्यावर आणखी एका जीवनपटाची भर पडणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर अर्थात विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनाचे भाष्य करणारा व त्यांचा संघर्ष दर्शविणाऱ्या चित्रपटाची तयारी अगदी जोरोशोरोसे सुरु आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस यावा याकरिता संपूर्ण टीम कार्यरत आहे. मराठमोळे पण हिंदी सिनेसृष्टीतही दबदबा असणारे दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. अलीकडे सावरकरांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून या चित्रपटाची त्यांनी घोषणा केली होती. मात्र यात मुख्य भूमिका कोण साकारणार ते काही सांगितले नाही. अद्याप या चित्रपटात कुणाची वर्णी लागणार हा मोठा प्रश्न असला तरीही काही अभिनेत्यांची नवे जोरदार चर्चेत आहेत.

 

मुळात स्वातंत्र्यवीर सावरकर अर्थात विनायक दामोदर सावरकर हे एक पात्र नसून हि एक आव्हानात्मक व्यक्तिमत्वाची तत्त्वपर भूमिका आहे. यामुळे हि भूमिका साकारणे आणि तितकीच उठावदार असणे अत्यंत आव्हानाचे कार्य आहे. या चित्रपटाचे नावही ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ असेच आहे. या चित्रपटासाठी बॉलिवूडच्या तीन अभिनेत्यांची नावं अगदी जोरदार चर्चेत आहेत. यात आयुषमान खुराना, रणदीप हुद्दा आणि राजकुमार राव हि तीन नावे शर्यतीत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर मुळातच पहाडाएवढे उत्तुंग व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांची व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत करण्यासाठी एका सशक्त अभिनेत्याची गरज आहे. त्यामुळे हि तिन्ही नवे अगदी एकमेकांना पुरून उरणारी आहेत.

 

आयुष्यमान असो की, राजकुमार किंवा मग रणदीप हे तिघेही आपल्या चित्रपटासाठी अक्षरश: अतोनात मेहनत घेतात. भूमिकेसाठी शारिरीक बदल घडवण्यास ते नेहमीच तयार असतात. ‘सरबजीत’ या चित्रपटासाठी रणदीपने अगदी २० दिवसांत १८ किलो वजन कमी केले होते. तर राजकुमार राव याने आपल्या प्रत्येक चित्रपटात वेगळ्या लुकसोबत प्रेक्षकांची भेट घेतली आहे. तर आयुषमानने आपल्या चित्रपटासाठी सिंगिंग करिअरलादेखील थोडा ब्रेक दिला आहे.

त्यामुळे वीर सावरकर यांची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी या तिघांची नावं चर्चेत असण्यास ते पात्र आहेत. तर या शर्यतीत आयुष्यमानचे नाव या सगळ्यांत पुढे असल्याचे समोर येत आहे. मात्र अद्याप कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. या चित्रपटाचे शूटिंग लंडन, अंदमान आणि महाराष्ट्राच्या इतर काही भागात होणार आहे. दरम्यान सावरकर यांचे निवासस्थान दादर मध्ये आहे, यामुळे तेथेही चित्रीकरणाचे काही सिन घेतले जाण्याची शक्यता आहे.

Leave a Comment