प्रजासत्ताक दिन विशेष | प्रजासत्ताक दिन देशभर राष्ट्रीय सन म्हणून मोठ्या दिमाघात साजरा केला जातो. दर वर्षी २६ जानेवारीला शाळा, महाविद्यालयांमध्ये तसेच सरकारी कार्यालयांमध्ये झेन्दावंदन केले जाते. परंतु २६ जानेवारी रोजीच प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो हे अनेकांना ठाऊक नसते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या कारणामुळे २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.
१) २६ जानेवारी १९५० रोजी आपण भारतीय संविधानाचा स्वीकार केला. आणि त्याची आठवण म्हणून आपण तेव्हापासून तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.
२) प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधानाचा स्वीकार करून आपण प्रजेची सत्ता स्थापन केली असे मानले जाते.
३) डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले भारतीय संविधान स्वीकारून आपण भारताला लोकशाही राष्ट्र म्हणून स्वीकारले.
४) तसे पहिले तर संविधान बनवण्याचे काम अनेक वर्ष सुरु होते. मात्र २६ जानेवारी १९५० या दिवशी भारतीय संसदेमध्ये संविधान स्वीकारण्यात आले.
५) १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून आपण साजरा करतोच. पण त्याचसोबत आपण ज्या दिवशी देशाचा कारभार, कायदे हे सार कसे चालणार हे ठरवलं आणि लोकशाहीचा स्वीकार करत संविधान स्वीकारलं तो दिवशी तितकाच महत्वाचा आहे. आणि म्हणूनच २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.
इतर महत्वाचे –
आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाला…
आणि भगतसिंहांना फाशीची शिक्षा देण्यात आली
भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा पाया रचणारे कणखर नेतृत्व : लोकमान्य टिळक