पुणे : रायगडावर रामदासाचे चित्र कशासाठी… असा संतप्त सवाल संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक, संतोष शिंदे, यांनी केला आहे. रामदास आणि शिवाजी महाराज यांचा कुठलाही संबंध नसताना जाणीवपूर्वक खोडसाळपणे रामदास दाखवण्यात येतो असा आरोप त्यांनी केला. तसेच आपल्याला किल्ले रायगडाचे पावित्र्य राखले गेले पाहिजे असेही ते म्हणाले.
रोप-वे मधून जाताना सर्वप्रथम पायथ्यालाच रायगडावर रामदासाचे दर्शन होते. रामदास आणि शिवाजी महाराज यांचा कुठलाही संबंध नसताना जाणीवपूर्वक खोडसाळपणे रामदास दाखवण्यात येतो. रामदासाच्या चरणी शिवाजी महाराज व्याकुळ होऊन नतमस्तक होतात, असे चित्र लावण्यात आले आहे, ते अनऐतिहासिक असून याचा कुठलाही संबंध व संदर्भ नाही. हा सर्व RSS चा खोडसाळपणा आहे. तात्काळ काढून टाकले पाहिजे असे ते म्हणाले.
रोप-वे रायगड किल्ल्यावर येणाऱ्या तमाम हजारो शिवप्रेमींची दररोज लूट होते. रोपे द्वारे जाऊन येऊन रिटन प्रत्येकी तिकीट 320 रुपये आहे. एवढे दर आकारण्याचे कारण काय…! रायगडावर इतर शिवप्रेमींनी जायचंच नाही का…! ही लूट हे थांबलं पाहिजे. तिकीट दर नियंत्रित केले पाहिजे. म्हणून महाराष्ट्र सरकारने हे ताब्यात घेतले पाहिजे अशी मागणी संतोष शिंदे यांनी केली.
https://www.facebook.com/100001336494061/posts/4555492771171894/
रोप-वे प्रशासनाकडून किल्ल्यावर प्रतीक्षालयाच्या नावाखाली अनाधिकृत बांधकाम केलेले आहे. रायगड किल्ल्यावर पक्क्या बांधकामाला परवानगी नसताना अजून बऱ्याच ठिकाणी रोपवे किल्ले प्रशासनाने अनधिकृत बांधकाम केले आहे. 1996 पासून रोप-वे सुरू आहे. मात्र काल-परवा केलेले बांधकाम सुद्धा 1996 ला झाले आहे असं खोटेपणाने सांगतात. याकडे कुणाचेच लक्ष नाही. जिल्हाधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग यांचं लक्ष नाही असेच दिसते. गड संवर्धन समिती काय काम करते.
किल्ले रायगडावर प्रत्येक शिवप्रेमींना आता प्रत्येकी २५ रुपये प्रवेश शुल्क कशासाठी…! हे थांबवा. छत्रपतींची प्रेरणा म्हणून राज्यातील प्रत्येक शिवप्रेमी रायगडावर नतमस्तक होण्यासाठी येत असतो. जर त्याच्या कडून प्रवेश शुल्क म्हणून पंचवीस रुपये उकळले जाणार असतील त्या प्रत्येक शिवप्रेमींच्या मनामध्ये नाराजी निर्माण होईल. पैसे घेणार यांचा संबंध आणि प्रशासनाचे कर्तुत्व काय…? तात्काळ रद्द करा. या पैशातून संपूर्ण किल्ल्याची देखभाल दुरुस्ती होणार नाही हे लक्षात ठेवावे असे ते म्हणाले.
रायगडाचे पावित्र्य राखले पाहिजे. केंद्र सरकार तथा पुरातत्व विभाग मनमानी पद्धतीने शिवप्रेमींनी वर हे लादणार असेल तर तात्काळ रद्द केली पाहिजे, अनधिकृत बांधकाम आणि महाराष्ट्र सरकारने रायगड किल्ला ताब्यात घेऊन रोपवे चे तिकीट दर कमी केली पाहिजे, चुकीचा इतिहास रायगडावर दाखवला गेला नाही पाहिजे आणि प्रवेश शुल्क रद्द केले पाहिजे हे तमाम शिवप्रेमींची मनस्वी इच्छा आहे.
या सर्व वरील प्रकाराबाबत संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राच्या वतीने आम्ही स्वतः मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राज्य सरकार, पुरातत्त्व विभाग यांना पत्रव्यवहार करून या संपूर्ण गैरप्रकाराबाबत आवाज उठवणार आहे. कदाचित आंदोलन सुध्दा करावे लागेल. पूर्वीपासून किल्ले रायगडावर लक्ष दिले नाही म्हणून वाघ्या कुत्रा आला, शिवरायांच्या समाधीवर काल-परवा मानवी हाडे अर्थात ‘अस्थी’ ठेवण्यात आली. विरोध केला नसता तर भविष्यात त्यातही खडगं तिथं बांधले जाईल. आम्ही मात्र गाफील असू… किल्ले रायगड आपली अस्मिता आहे. त्या ठिकाणाचे गैरप्रकार आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला.