हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विमानाने प्रवास करावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. प्रत्येक सामान्य नागरिकाच्या ड्रीम लिस्टमधील विमानाने प्रवास करणे ही एक इच्छा नेहमी असते. विमानाने प्रवास करताना सगळ्यांना विंडो सीट जवळ बसण्याची देखील खूप आतुरता असते. कारण विमानातून दिसणारे दृश्य हे एक अद्भुत दृश्य असते आणि त्याचा अनुभव प्रत्येकाला घ्यायचा असतो. परंतु तुम्ही कधी नोटीस केलय का की, विमानाच्या खिडक्या या गोलाकार का असतात? असा प्रश्न अनेकांना पडलेला असेल, तर आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत. विमानाच्या खिडक्या गोलाकार का असतात?
एका अहवालानुसार अशी माहिती समोर आलेली आहे की, अगदी पूर्वीपासूनच विमानाच्या खिडक्या या गोलाकार नव्हत्या. 1950 पूर्वी विमानाच्या खिडक्या या चौकोनी आकाराच्या होता . परंतु त्यावेळी विमाने अगदी हळू चालत होती आणि आजच्या तुलनेत अगदी कमी गतीने उडत होती.
आता विमानाच्या खिडक्या गोलाकार का असतात? यासंबंधी माहिती देताना स्कॉटची फ्लाईटचे प्रॉडक्ट ऑपरेशन स्पेशलिस्ट विलिस यांनी सांगितले आहे की, विमानाच्या खिडक्या म्हणजे गोलाकार करण्या मागे अनेक कारण आहेत. सुरुवातीला विमानाच्या खिडक्या चौकोनी होत्या. परंतु विमानाच्या सुरक्षिततेसंबंधी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. कारण विमान जेव्हा कशात उडते त्यावेळी हवेचा एक विशिष्ट दाब तयार होतो. गोलाकार खिडक्या असल्यामुळे हवेचा दाब खिडक्यांवर सारखाच राहतो.
त्यामुळे खिडक्या क्रॅक होण्याचा धोका देखील कमी असतो. विमान जेव्हा आकाशात जाते. तेव्हा विमानाच्या आतील आणि बाहेरील हवेचा दाब मोठ्या प्रमाणात असतो. खिडकी जर चौकोनी असेल, तर तो दाब जास्त येतो आणि खिडकी क्रॅक होण्याची किंवा डॅमेज होण्याची शक्यता असते. परंतु गोलाकार खिडकी असल्यामुळे हवेचा दाब बदलला, तरी खिडकी क्रॅक होण्याची शक्यता कमी असते. कारण विमानाची गती वाढल्यामुळे तो दाब देखील वाढलेला असतो.
त्याचप्रमाणे असे देखील सांगण्यात आलेले आहे की, जेव्हा 1950 पूर्वी विमाने चालत होती. त्यावेळी विमाने अगदी संथ गतीने चालत होती. त्यामुळे त्यांना अधिक इंधन देखील लागत होते. त्यामुळे विमानाने प्रवास करणे हा सामान्य नागरिकांसाठी अगदी खर्चिक विषय होता. परंतु हळूहळू विमानाने प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या वाढली आणि इंधनाचा खर्च कमी व्हावा. यासाठी विमान कंपन्यांनी वेग वाढवला. विमानाचा वेग वाढल्याने आपोआपच हवेचा दाब जास्त आला. आणि हवेचा दाब कमी करण्यासाठी आणि विमानात असणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा धोका पोहोचू नये, यासाठी विमानाच्या खिडक्या या गोलाकार बसवल्या गेल्या.