अजित पवार आपल्या बालेकिल्लातच विधानसभा निवडणुकीसाठी तयार का नाहीयेत?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बारामतीतून निवडणूक लढवण्यासाठी मी फारसा इच्छुक नाही, विधानसभा निवडणुकीत आमदारांना सांगून पाडणाऱ्या अजित दादांचं हे स्टेटमेंट…. कार्यकर्त्यांकडून बारामतीच्या विधानसभेसाठी जय पवार यांच्या उमेदवारीची मागणी होतेय, या पत्रकारांच्या प्रश्नावर अजितदादांनी दिलेलं हे उत्तर… मागच्या टर्मच्या लोकसभेला मावळ मतदार संघातून मुलगा पार्थ… यंदाच्या लोकसभेला बारामतीतून पत्नी सुनेत्रा वहिनी… यांच्या पराभवानं अजित दादांचं राजकीय खच्चीकरण झालं… पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ज्याला अजितदादांचा बालेकिल्ला म्हटलं जातं त्याच बारामती विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीतून अजितदादा यंदा निवडणूक लढणार नाही, अशी राजकीय चर्चा सध्या होऊ लागलीय…

या चर्चेमुळे दोन प्रश्नांचा गुंता आणखीनच गुंतागुंतीचा झालाय… पहिला म्हणजे बारामतीतून अजित पवार नाहीत तर नेमकं कोण? आणि दुसरं म्हणजे अजितदादा बारामतीतून नाही तर कुठल्या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार याचा… आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हक्काचा बालेकिल्ला सोडून दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची रिस्क अजितदादा का घेतायत? शरद पवारांकडून तर जवळपास युगेंद्र पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहेच… पण मग अजित पवार घड्याळाकडून बारामतीतून कुणाला प्रमोट करू पाहतायत? अजितदादांच्या डोक्यात आणि राष्ट्रवादीच्या गोटात नेमकं काय चालूय? त्याचंच हे राजकीय डिकोडिंग…

Ajit Pawar आपल्या बालेकिल्लातच विधानसभा निवडणुकीसाठी तयार का नाहीयेत? | Baramati Vidhan Sabha

बारामतीतून अजित पवार आमदारकीला उतरणार नाहीत, त्याचं पहिलं कारण देता येऊ शकतं ते बारामतीचे भावनिक वातावरण… शरद पवारांनंतर बारामती विधानसभा मतदारसंघ हा अजित पवारांचा बालेकिल्ला समजला जातो… इथं अजितदादांच्या विरोधात लढत देण्यासाठी विरोधकांना उमेदवाराची आयतवारी करावी लागते… सारी ताकद खर्ची घालूनही अजितदादांचं लीड कधीच पन्नास हजाराच्या खाली येत नाही… पण राष्ट्रवादीच्या फुटीनंतर जसं राज्याचं राजकारण बदललं तितक्याच वेगानं बारामतीचही… अजितदादांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना तिकीट दिलं… खासदारकीच्या निवडणुकीला कौटुंबिक राजकीय आखाडा बनवून टाकला… खर तर आपला कार्यकर्त्यांशी कनेक्ट चांगला आहे… पदाधिकारी – कार्यकर्ते – हितचिंतक यांच्या जोरावर आपण किमान आपल्या विधानसभा मतदारसंघातून तरी सुनेत्रा पवारांच्या पाठीशी मोठं लीड देऊ शकतो… असा अजितदादांचा अंदाज होता.. पण तो सपशेल फेल ठरला बारामतीतूनच सुनेत्रा पवार चाळीस हजारांहून अधिकच्या मतांनी पिछाडीवर गेल्या… हा आकडा स्पष्ट सांगतोय येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला बारामतीची जागा अजित दादांसाठी डेंजर झोनमध्ये आहे… शरद पवारांच्या बाजूने असणारी सहानुभूती अजूनही ओसरलेली नाही त्यामुळे जर लोकसभेचा निकाल विधानसभेला कायम राहिला तर अजितदादांचं राजकीय करियरच शून्यात जाऊ शकत… त्यामुळेच ते बारामतीतून जय पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून आपल्यासाठी कर्जत किंवा चिंचवड सारख्या दुसऱ्या सेफ मतदार संघातून आमदारकीला उभे राहू शकतात…

अजितदादांच्या बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक न लढण्याच्या चर्चेला आणखीन बळ मिळतं ते कर्जत जामखेडमध्ये चाललेल्या हालचाली पाहून…कर्जत जामखेडमध्ये अजितदादा निवडणूक लढल्यास काय होईल? असा ग्राउंड सर्वे सुरू असल्याची माहिती स्वतः रोहित पवार यांनी दिली होती… त्यामुळे अजितदादा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढता येईल का? याची चाचपणी करत असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जाऊ लागलय… भविष्याच्या दृष्टीने लढत द्यायची झालीच तर एक सेफ मतदारसंघ असावा याच जाणिवेतून अजितदादांनी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची बांधणी केली होती… रोहित पवारांना 2019 मध्ये निवडून आणण्यासाठी खरी ताकद ही अजितदादांनीच लावल्याचं बोललं जातं… कर्जत जामखेड मधील राष्ट्रवादी फुटीनंतरची कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांची मोठी फळी ही आजही अजितदादांच्या पाठीशी असल्याचे पाहायला मिळतं… त्यामुळे कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार विरुद्ध अजित पवार… आणि बारामतीमध्ये जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी संभाव्य लढत अजितदादांना अपेक्षित असल्याचं बोललं जाऊ लागलंय…. अजितदादांची राष्ट्रवादी लक्ष देऊन कर्जत जामखेड विधानसभेमध्ये निवडून येण्यासाठीची स्ट्रॅटर्जी – प्लॅनिंग आखत असल्याचही चित्र कर्जत जामखेड मध्ये पाहायला मिळतं…

आता याच चर्चेतला तिसरा मुद्दा येतो तो अजितदादांना विधानसभा निवडणुकीत राज्याच्या राजकारणात लक्ष घालता येणे….लोकसभा निवडणुकीला इन मीन चार जागांवर लढत देणाऱ्या अजितदादांच्या राष्ट्रवादीने सगळा फोर्स हा बारामतीच्या जागेसाठी लावला होता… ननंद विरुद्ध भाऊजयी अशी लढत लावून अजितदादांनी बारामतीची जागा प्रतिष्ठेची बनवली होती… निवडणूक प्रचारात तर ते अक्षरशः बारामतीमध्ये तळ ठोकून बसले होते… त्यामुळे त्यांना इतर मतदारसंघात फारसे लक्ष घालता आलं नाही… त्याचाच फटका म्हणजे बारामतीची जागा तर गेलीच पण अवघ्या एका जागेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीला विजय मिळवताला… तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी नव नाव आणि नव चिन्ह असून देखील तब्बल आठ जागांवर दणक्यात विजय मिळवला… लोकसभेला झालेली चूक अर्थातच अजित दादांना विधानसभेला पुन्हा करायची नाहीये… जर अजितदादा यंदाही बारामती विधानसभा मतदारसंघातूनच निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर ते मतदारसंघात अडकून जातील… महाराष्ट्रातील इतर विधानसभा मतदारसंघात त्यांना लक्ष घालता येणार नाही… राजकारणाची पेरणी करता येणार नाही… त्यामुळे बारामतीतून मुलाला उतरून आपल्या कार्यकर्त्यांची फौज त्याच्या पाठीशी लावून अजितदादा दुसऱ्या विधानसभा मतदारसंघातून लढत देऊ शकतील….