हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| रॉयल इन्फिल्ड बुलेट तरुणांकडे सर्वाधिक पाहायला मिळते. तसेच या बुलेटवर आपल्याला काही कापडी पट्ट्या देखील लावलेल्या दिसतात. आपण त्यांना नीट पाहिला गेलो तर या पट्ट्यांवर चिनी किंवा जपानी भाषेमध्ये काहीतरी लिहिलेले असते. परंतु यामागील नेमका अर्थ काय असतो हे तुम्हाला माहित आहे का? असेल माहीत तर हा लेख पुर्ण वाचा.
रॉयल इन्फिल्डवर लावण्यात आलेल्या या पट्ट्यांना तिबेटीयन भाषेत ‘प्रेयर फ्लॅग्ज’ असे म्हणतात. या पट्ट्यांना आपण तिबेटी पवित्र प्रार्थना ध्वज असे देखील म्हणू शकतो. या पट्ट्यांमध्ये दोन प्रकार असतात. त्यातील आडव्या पट्ट्यांना म्हणजेच फ्लॅग्जला “लुंग ता” असे म्हटले जाते. तर उभ्या असलेल्या पट्ट्यांना “डार चोग” असे म्हणण्यात येते. याचाच अर्थ पवित्र ध्वज असा होतो. या पट्ट्यांवर जी आपल्याला अक्षरे दिसतात तो एक बौद्ध मंत्र आहे. जो ॐ मणिपद्मे हूं ! अशा शब्दात आहे.
असे म्हणतात की, या मंत्राचा जप केल्यानंतर राग, लोभ, मत्सर, द्वेष अशा सर्व गोष्टीतून माणूस मुक्त होतो. खास म्हणजे, अनेकजण हा फ्लॅग्ज गुड लक म्हणून देखील आपल्या गाड्यांवर लावतात. आणखीन एक खास बाब म्हणजे, हे फ्लॅग्ज आपल्याला वेगवेगळ्या रंगांमध्ये दिसून येतात. कारण हे रंग पाच वेगवेगळ्या तत्त्वांचे प्रतिनिधित्व करतात. जसे की, पांढरा रंग वाऱ्याचे, लाल रंग आगीचे, हिरवा रंग पाण्याचे, पिवळा रंग पृथ्वीचे आणि निळा रंग आकाशाचे प्रतिनिधित्व करतो.
तिबेटीयन लोक असे मानतात की, हा फ्लॅग्ज कधीही जमिनीवर पडता कामा नये. हे फ्लॅग्ज जमिनीपासून काही उंचीवर लावलेले असावेत. जेणेकरून या मंत्रांमुळे सकारात्मक ऊर्जा हवेमध्ये सर्व दूर पसरत जाईल. या फ्लॅग्जवरील मंत्र किंवा रंग पुसट झाले तर ते शुभ मानले जाते. या सर्व कारणांमुळेच गाडी असो किंवा बाईक त्यावर आपल्याला प्रेयर फ्लॅग्ज लावलेले दिसतात.