या कारणामुळे २५ डिसेंबरच्या रात्री नाताळ सण साजरा केला जातो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

#HappyChristmas | आपल्या अमावास्या, पौर्णिमा या तिथी जशा चंद्रावर अवलंबून असतात तसा प्रकार इसवीसनाच्या ख्रिस्ती कालगणनेत नाही. तिथे सूर्य भ्रमणालाच अधिक महत्त्व आहे आणि २५ डिसेंबरला आपले सूर्यमहाराज नेहमीपेक्षा थोडे कमीच वेळ दर्शन देत असतात. आणि त्याच दिवशी नाताळ असतो.

२१ डिसेंबरचा दिवस हा वर्षातील सर्वांत छोटा दिवस. दिवस छोटा याचा अर्थ रात्र मोठी. त्यामुळे २५ डिसेंबरची रात्र ही तुलनेने मोठीच असणार. या मोठ्या रात्रीत मेणबत्त्या पेटवाव्यात, आनंदोत्सव साजरा करावा, असे कोणाला वाटले तर ते योग्यच ठरेल. शिवाय हा दिवस येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस. आता येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून हा दिवस मानला जात असला तरी पूर्वी येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस ६ जानेवारी मानला जात असे.

जवळपास साडेसोळाशे वर्षांपूर्वी त्या वेळच्या पोप महाशयांनी हा दिवस २५ डिसेंबर हा मानावा असा निर्णय दिला. त्यांनी येशूख्रिस्ताचा जन्मदिन २५ डिसेंबर रोजी साजरा करावा, असे फर्मान काढले आणि त्या वेळेपासून हा दिवस २५ डिसेंबरला साजरा केला जाऊ लागला. जगभरचे ख्रिस्तानुयायी या दिवशी आनंद व्यक्त करतात. साधू, संत, महात्मे यांची जयंती साजरी करण्याची प्रथा आणि परंपरा सर्व जगभर पाळली जाते.

जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात ख्रिसमसचा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर या धर्ममताचे काही अनुयायी, काही पंथ हे मात्र २५ डिसेंबरच्या सायंकाळी हा दिवस साजरा करतात. भारतीय धर्म-संस्कृतीशी ऋणानुबंध जोडून दाखविणारा आणखी एक विशेष या २५ डिसेंबरशी निगडित आहे. प्राचीन काळात रोम राज्यात २५ डिसेंबर हा दिवस सूर्याची जयंती म्हणून मानला जात होता.

आपली धर्मसंस्कृती सूर्यपूजक आहे. २५ डिसेंबर या दिवशी प्राचीन रोम संस्कृतीने सूर्याशी जसे नाते जोडून ठेवले त्याचप्रमाणे मोठ्यात मोठ्या दिवसाशी आपल्या मोठ्यात मोठ्या सणाचे नाते जोडून ख्रिस्तानुयायांनी एक सांधा जोडून घेतला किंवा जाणता-अजाणता त्यांच्याकडून जोडला गेला, असे म्हटले पाहिजे.

Leave a Comment