इटलीमध्ये कोरोनाचे एवढे बळी का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लढा कोरोनाशी | इटली आणि स्पेनमध्ये कोरोनाने अक्षरशः मृत्यूतांडव घातलं. जगात इतर देशही कोरोनाशी लढा देत आहेत, मग इटलीला नक्की कुठे त्रास होतोय? ट्रेसी बियान्झ या अनकव्हर डीसी नियतकालिकाच्या संस्थापक आणि मुख्य संपादकांनी याचा शोध घेणारा लेख लिहला आहे. मराठी वाचकांसाठी याचा अनुवाद जयश्री देसाई यांनी केला आहे.

वुहानच्या कोरोना विषाणूने इटलीचा नाश झाला आहे.  पण संक्रमणापेक्षाही जास्त त्याची कारणे जागतिकीकरणाशी जोडली आहेत.  इटलीमध्ये लाखो चीनी लोक जगण्यासाठी स्थलांतरित झाले आहेत. पैकी काही कायदेशीररित्या तर काही बेकायदेशीर रित्या आलेले आहेत. साधारण ३ लाख चायनीज लोकांची इटलीमध्ये कायदेशीररित्या नोंद आहे. पण बरेच जण आहेत हे बेकायदेशीररित्या येथे राहतात. इटलीने नुकतीच चीनसोबत ‘वन बेल्ट, वन रोड’  या नावाने एक आर्थिक भागीदारी केली आहे. चीनने युरोपमध्ये माल अधिक कार्यक्षमतेने नेण्यासाठी इटलीतील उत्तरेकडच्या बंदरांचे पुरुज्जीवन केले. इटलीमधील चीनी ‘वंशद्वेष’ दूर करण्यासाठी फ्लोरेन्सच्या महापौरानी चीनची निर्मिती असलेला एक व्हिडीओ ‘चीनच्या एका जिगरी दोस्ताला आलिंगन’ (Hug a Chinese)  या अभियानासाठी मुख्य स्रोत म्हणून वापरला. 

इटलीतील मृतांच्या शवपेट्या

तीस वर्षांपूर्वी इटलीला या बेकायदेशीर स्थलांतराचे काय परिणाम होऊ शकतात? हे दिसायला सुरुवात झाली होती. आश्चर्य म्हणजे हे स्थालांतरित देशात घुसण्यासाठी केवळ सीमेवरून चालत येत नसत तर चीनपासून कळपाने येत होते. सुरुवातीला इटलीने चीनी कामगारांना त्यांच्या हस्तकौशल्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शहरांमध्ये आणि खेड्यांमध्ये कमी वेतनामध्ये वस्त्र तयार करण्यासाठी कामाला घेतले. चीनी लोक हे काम जलद आणि स्वस्त करायचे.  हे लोक खूपच लवकर हे काम शिकतायत हे इटलीच्या लोकांच्या नजरेत आले. इटलीच्या बऱ्याच मालकांना जास्त किमतींमुळे त्यांचे व्यवसाय बंद करावे लागल्याचे दिसून आले. इटलीची हस्तकला पूर्णतः चीनी लोकांनी ताब्यात घेतली आणि आपली केली. बदलला नाही तो फक्त ‘मेड इन इटली’ हा शिक्का. न्यूयॉर्क टाइम्सने २०१० साली या कलांचे दस्ताऐवजीकरण करण्यास सुरुवात केली. 
काही वर्षांनी इटलीला एक कठीण धडा मिळाला तो म्हणजे आता आपण किमतीच्या बाबतील चीनशी स्पर्धा करू शकत नाही. इटलीचा व्यावसायिक वर्ग संख्येपेक्षा गुणवत्तापूर्ण माल विकण्याचे स्वप्न पाहत होता.

सुसज्ज उपचारयंत्रणा असतानाही अपयश

शतकानुशतके फ्लोरेन्सच्या बाहेरील प्रटोह हे मध्ययुगीन शहर ‘मेड इन इटली’ हा शिक्का डोळ्यांत भरणाऱ्या उत्कृष्ट फॅब्रिकचे उत्पन्न करणारे शहर बनून गेले होते. मग चीन इथे आला. १९८० दशकाच्या उत्तरार्धात सुरुवातीला काही आणि मग हजारोंच्या संख्येने चीनी लोक प्रटोहमध्ये स्थलांतरित होऊ लागले. वस्त्रोद्योगाच्या या केंद्राला कमी किंमतीच्या वस्त्र उत्पादन केंद्राच्या रूपात बदलवून टाकले. यामुळे अनेकांच्यात संताप निर्माण झाला. ही सगळी तडफड धर्मांधता आणि ढोंगीपणाकडे आली. हे शहर आता युरोपमधील सर्वाधिक चीनी लोकांचे प्रमाण असणारे  शहर आहे. काही कायदेशीर आहेत आणि बरेच जण बेकायदेशीर. आता इथे टस्कनीच्या मध्यभागी चीनी लोक चीनमधून आयात केलेल्या कच्च्या मालावर २४ तास काम करून ३,२०० च्या आसपास उदयॊग करत आहेत. ज्यामध्ये कमी किंमतीचे कपडे, पादत्राणे आणि दागिने येतात. जे जगभर कमी किंमतीत विकले जातात.

इटली आणि चीन संबंध गुंतागुंतीचे..??

इटलीमधील ही कला असणारी गावे आता चीनी झाली आहेत. चीनी लोक इथल्या दशकांपासून काम करणाऱ्या स्थानिक लोकांचे व्यवसाय हाकलून देऊन त्यांना विस्थापित करत आहेत आणि त्यांचे स्वतःचे शेजारी तयार करत आहेत. ते कधीच नियम पाळणारे म्हणून ओळखले जात नव्हते. यामुळे इटलीच्या बऱ्याच लोकांना त्रास झाला. त्यांना चीनचे कर भरण्यास आणि त्यांच्या व्यवसाय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास भाग पाडले. जिथे इटलीच्या लोकांचे उत्तरदायित्व जास्त होते आणि चीनचे कमी तिथे चिनी लोकांनी नियमांचे उल्लंघन करून, त्यांच्या लोकांशी वाईट वागून आणि मानवी तस्करीच्या जोरावर उद्योगधंदयांची भरभराट करून घेतली. अशा दूरवरून आलेल्या स्थलांतरितांमुळे होणाऱ्या समस्यांशिवाय इतर अनेक निंदनीय समस्या दिसतात.

२०१७ साली बँक ऑफ चायना त्यांच्या मिलान शाखेचा समावेश असणाऱ्या अवैध सावकारीच्या प्रकरणात ६०००००० युरो दंड भरण्यास तयार झाल्याचे कागदपत्रे सांगतात. या खटल्याच्या सुनावणीत फ्लोरेन्स कोर्टाने चीनमध्ये ४ थ्या क्रमांकावर असणाऱ्या या मोठ्या बँकेच्या ४ कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर पैशाच्या हस्तांतरणाच्या  आरोपाखाली निलंबन आणि दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. २००६ ते २०१० च्या काळात तथाकथित ‘रिव्हर ऑफ मनी’ या प्रकरणात चीनने इटलीमधून ४.५ अब्जांपेक्षा (४. ७८ अब्ज डॉलर) युरोंची तस्करी केल्याचा आरोप फ्लोरेन्स कोर्टाच्या वकिलांनी केला होता.

वेगळी नोंदणी – माझ्या मैत्रिणीच्या ओळखीतील एक व्यक्ती सध्या इटलीमध्ये राहत आहे. तिथलं एकूण भयानक वातावरण बघितल्यानंतर तिच्याशी संपर्क साधला असता तिने आपण निवांत असल्याचं सांगितलं. ती ज्या कंपनीत काम करत आहे तेथील बहुतांश लोकांना कोरोनाची लागण झाली असली तरी तिथल्या भारतीय लोकांवर याचा काहीच परिणाम सध्यातरी दिसून येत नाही. विषाणूचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेली प्रतिकारशक्ती, वयोमान या सगळ्यांचा एकूण परिणाम पाहता इटलीमधील वाढत्या बळींचा अर्थ लावता येईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’

हे पण वाचा –

जगातील पहिल्या कोरोनाग्रस्ताचा लागला शोध, कोण आहे ‘हा’ व्यक्ती? घ्या जाणून

भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?

भयावह! इटलीत २४ तासांत कोरोनाने घेतला ९००हून अधिक जणांचा बळी

बेजबाबदारपणाचा कळस; IAS अधिकारीचं होम क्वारंटाइनमधून पळाला

भारतात ‘या’ ठिकाणी रोबोट करणार कोरोना रुग्णांची देखभाल!

नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन

 

Leave a Comment