औरंगाबाद | शहरातील नवीन कावसं भागातून शुक्रवारी बेपत्ता झालेल्या विवाहित महिलेच्या दीड वर्षाच्या मुलाचा त्याच दिवशी मृत्यू झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. आई बेपत्ता झाल्यानंतर या बाळाच्या अंत्यविधी नातेवाईकांनी परस्पर उरकुन घेतला. पोलिसांना फक्त घरातून विवाहिता बेपत्ता झाल्याची माहिती दिली होती. बेपत्ता झालेल्या महिलेच्या बाळाचा मृत्यू संशयास्पद वाटल्याने रविवारी पैठण पोलिसांनी तहसीलदार यांच्या उपस्थितीत त्या बाळाचा पुरलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात हलवला. शवविच्छेदना नंतर या प्रकरणातील बऱ्याच गोष्टी समोर येणार असल्याची शक्यता आहे.
नवीन कावसं भागात रवी असुदे हे घर जावई म्हणून राहतात. रवी यांचे शुक्रवारी पत्नी वैष्णवी सोबत घरगुती भांडण झाले. रागारागात रवी मोठ्या मुलाला घेऊन कामावर निघून गेले. संध्याकाळी रवी घरी आले असता. वैष्णवी बेपत्य होती. रवीने सासू सासर्यांना घेऊन थेट पोलीस स्टेशन घाठले आणि वैष्णवी बेपत्ता आहे असे सांगितले.
पोलिसांनी तपशीलवार तपास केला असता त्यांनी ही सुद्धा माहिती मिळाली कि ज्या दिवशी वैष्णवी बेपात्त झाली. त्याच दिवशी तिचे दीड वर्षाचे बाळ देखील मृत्यू पावले आणि त्याचा अंत्यविधी नातेवाईकांनी परस्पर केला. त्या बाळाचा मृतदेह पुन्हा बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी घाटी रुगणालयात हलविण्यात आले आहे. पोलिसांनी नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत रविवारी दुपारी त्या बाळाचा मृतदेह बाहेर काढला.