मुंबईत लोकल सुरु करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सहकार्य करावे राजकारण नाही- गृहमंत्री अनिल देशमुखांचे खडे बोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । सर्वसामान्यांना मुंबई लोकलचा प्रवास कधी सुरु होणार, अशी विचारणा करण्यात येत आहे. अनेकांचे हाल होत आहेत. नोकरी करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागलत आहे. यावरुन विरोधकांनी प्रश्न उपस्थित करुन राज्य सरकारवर टीका सुरु केली. दरम्यान, राज्य सरकारने रेल्वेला रितसह पत्र पाठवून लोकल सुरु करण्याची मागणी केली. मात्र, रेल्वेकडून याला खोडा घातलण्याचे काम करण्यात येत आहे. यावरुन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रेल्वेला चांगलेच टोकले आहे. मुंबईमधील लोकल सेवा सुरु करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सहकार्य करावे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. यामध्ये कोणतंही राजकारण आणले जाऊ नये असेही त्यांनी खडसावले आहे.

अनिल देशमुखांनी यावेळी सांगितले, की राज्य सरकारकडून सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वेला वेळापत्रक सूचवले. कधी गाड्या सोडायच्या आणि महिलांसाठी तासाला गाडी सोडण्याचे दिलेल्या पत्रात म्हटले आहे. मात्र, रेल्वे काहीना काही कारण सांगून बोट दाखवत आहे. लोकल सर्वसामान्यांना सुरू करण्याबाबत रेल्वेने राजकारण करू नये, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बजावले आहे.

लोकल सर्वसामान्यांना सुरू करण्याबाबत राज्य सरकारने सविस्तर वेळापत्रक रेल्वेला दिले आहे. गर्दी होऊ नये या अनुषंगाने हे वेळापत्रक दिले गेले आहे. लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू झाली तर त्यांना दिलासा मिळेल. यात रेल्वेने राजकारण करू नये. यापूर्वीही परप्रांतीय मजूरांना त्यांच्या गावी पाठवताना रेल्वे आणि राज्य सरकार यांच्यात वाद झाला होता. आता पुन्हा वादाची ठणगी पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment