लस घेतल्यानंतरही करोना का होतो? अदार पुणावाला यांनी दिले ‘हे’ उत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | करोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतरही अनेक लोकांना करोना झाल्याचे समोर आले आहे. यामुळे अनेक लोकांच्या मनात लसीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. सोबतच, यावर विविध पातळीवर चर्चा देखील सुरू आहे. यावर सिरम इन्स्टिट्यूटचे अदार पूनावाला यांनीच स्पष्टीकरण देऊन नागरिकांच्या मध्ये असलेल्या या संभ्रमाला दूर केले आहे.

एका वृत्तवाहिणीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आदर पूनावाला यांना करोनाची लस घेतल्यानंतरही करोना का होतो? हा प्रश्न विचारला गेला होता. त्यावर उत्तर देताना अदार पूनावाला म्हणाले की, सिरम इन्स्टिट्यूटच्या या लसीचे नाव कोव्हिशिल्ड आहे. या लसिमुळे तुम्हाला आजार होण्यापासून वाचवू शकत नाही. पण ही लस घेतल्याने तुम्हाला जास्त त्रास होणार नाही अथवा तुमचा मृत्यू होणार नाही. सोबतच, ही लस घेतल्यानंतर तुम्हाला 95% केसेस मध्ये रुग्णालयात भारती होण्याची गरज लागणार नाही.

ही लस म्हणजे एक प्रकारचे बुलेटप्रुफ जॅकेट असल्यासारखे आहे. गोळी लागल्यानंतर बुलेटप्रुफमुळे माणूस मारत नाही. मात्र तुम्हाला थोडेफार ड्यामेज होऊ शकते. जानेवारीपासून आत्तापर्यंत 4 कोटी लोकांना ही लस देण्यात आली आहे. यापैकी किती लोक परत रुग्णालयात भरती झाले हे पाहायला लागणार आहे असे पूनावाला म्हणाले. तसेच, या लसिमुळे करोना होणारच नाही असा दावा सिरमने कधीच केला नव्हता.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment