पवारसाहेब नेहमी हिंदूंच्या विरोधात का बोलता? निलेश राणेंचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या वक्तव्याने भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. माजी खासदार निलेश राणे यांनी देखील पवारांच्या या विधानावरून त्यांच्यावर टीका केली आहे. पवारसाहेब नेहमी हिंदूंच्या विरोधात का बोलता? मंदिर हा हिंदूंचा श्रध्देचा विषय आहे त्यात NCP ला त्रास होण्यासारखं काय? असा सवाल त्यांनी ट्विटद्वारे शरद पवार यांना उद्देशुन केला आहे.

“राज्यातील 1300 डॉक्टर आंदोलन करणार आहेत. नोकरीत कायम न केल्यामुळे डॉक्टरांची नाराजी आहे. राम मंदिरचा विषय काढून हिंदूंना डिवचण्यापेक्षा पवार साहेबांनी राज्य सरकारवर लक्ष द्यावे. राज्य सरकारने अगोदरपासून गंभीरतेने घेतलं असतं तर महाराष्ट्र ह्या संकटात देशामध्ये १ नंबर नसता.” असंही निलेश राणेंनी आपल्या दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले होते शरद पवार?
कोरोनामुळं जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संकटात सापडलेल्या नागरिकांना कसं बाहेर काढायचं याचा विचार आम्ही करतोय. त्याला पहिलं प्राधान्य देतोय, पण काहींना वाटतंय मंदिर बांधून करोना जाईल. त्यामुळं त्यांनी राम मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला असावा,’ असं पवार म्हणाले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment