हिवाळ्यात का वाढतो हृदयविकाराचा त्रास? जाणून घ्या आरोग्य तज्ज्ञांचे मत

Heart Attack
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | डिसेंबर महिना सुरू होणार आहे. आणि संपूर्ण राज्यामध्ये थंडी देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. थंडीमध्ये अनेक लोकांना विविध त्रास होत असतात. लोकांना थंडीमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक वेळा थंडीमध्ये हार्ट अटॅक आणि ब्लॉगचा धोका देखील वाढतो. त्यामुळे थंडीमध्ये आजारी लोकांना जास्त काळजी घ्यावी लागते. आता हृदयाचा आजार असणाऱ्या लोकांनी या थंडीत नेमकी कोणती काळजी घ्यावी? हे आपण जाणून घेणार आहोत.

जर जास्त थंडी असेल तर आपल्या शरीरातील रक्त वाहिन्या गोठण्याचे प्रमाण देखील जास्त होते. वाढत्या थंडीमुळे हा त्रास अनेक लोकांना उद्भवतो. यामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात. आणि याचा परिणाम तुमच्या हृदयावर होता. हृदयापर्यंत रक्त प्रवाह नीट पोहोचत नाही. त्यामुळे हृदयविकाराची शक्यता देखील वाढते. तसेच रक्तदाब देखील वाढण्याची शक्यता हिवाळ्यामध्ये जास्त असते.

थंडीच्या काळात अनेक लोकांना जास्त भूक लागते. त्यामुळे आपण जास्त खात असतो. आणि अनेक वेळा याचा आपल्याला त्रास होतो. थंडीच्या काळात नेहमी उबदार आणि गरम कपडे घालावे. तसेच रात्रीच्या वेळी बाहेर पडू नये. जास्त थंडी असेल तर आपल्या शरीराला त्याचा त्रास होतो. त्यामुळे हात मोजे पायात मोजे घालावे. पदार्थांनी आपल्या शरीराला हिट मिळते त्या पदार्थांचे सेवन करावे. खास करून थंडीमध्ये अक्रोड आणि बदामाचा तुमच्या आहारात समावेश करावा. यामुळे तुमच्या शरीराला उष्णता मिळते.

हिवाळ्यामध्ये आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे शरीराला तसेच हृदयाला रक्त पुरवठा नीट होत नाही. यामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. आणि हृदयविकार होण्याची शक्यता देखील वाढत असते. त्यामुळे थंडीमध्ये स्वतःला जपणे खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्ही तुमचा आहारात देखील योग्य गोष्टीचे सेवन केले पाहिजे. आजकाल हृदयविकाराचा आजार कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो. यासाठी वयाचे कोणतेही बंधन नाही. खास करून थंडीमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण देखील वाढते. लोकांना सकाळी श्वास घ्यायला देखील त्रास होतो. त्यामुळे शक्यतो सकाळी आणि संध्याकाळीच्या वेळेला घराबाहेर पडू नका. तसेच दिवसा कोवळ्या उन्हामध्ये फिरायला जा.