इन्शुरन्स क्लेम का नाकारला जातो? जाणून घ्या यामागील कारणे आणि उपाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । इन्शुरन्स हा हेल्थचा असो वा लाईफसाठीचा. ऑटो इन्शुरन्स असो वा होम किंवा मौल्यवान वस्तूचा असो, जो आता काळाची गरज बनला आहे. अडचणीच्या वेळी कोणत्याही प्रकारचा इन्शुरन्स कामी येतो. कोरोना महामारीने इन्शुरन्सचे महत्त्व चांगल्या प्रकारे समजावून सांगितले आहे. मात्र हा इन्शुरन्स निरुपयोगी ठरतो जेव्हा इन्शुरन्स कंपनी तुमचा क्लेम नाकारते. असे दिसून आले आहे की, इन्शुरन्स कंपन्या काही ना काही चूक सांगून क्लेम नाकारतात. त्यामुळे ज्या गोष्टींमुळे तुमचा क्लेम रद्द होऊ शकतो, त्या गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

जेव्हा तुम्ही इन्शुरन्स खरेदी करता तेव्हा एजंट तुम्हाला पॉलिसीबद्दल अनेक मोठ-मोठे क्लेम करतात. मात्र पॉलिसी खरेदी करणे तेव्हाच यशस्वी मानले जाईल जेव्हा तुम्हाला तुमचा इन्शुरन्स क्लेम कोणत्याही त्रासाशिवाय मिळेल. इन्शुरन्स क्लेम फेटाळण्याची समस्या अनेक वेळा समोर येते. मात्र, इन्शुरन्सशी संबंधित अटी आणि नियम काळजीपूर्वक वाचले आणि त्यांचे पालन केले, तर या समस्येवर बऱ्याच अंशी मात करता येऊ शकते.

अटी आणि नियम नीट वाचा
इन्शुरन्स काढताना बहुतेक लोकं इन्शुरन्स कंपनीने दिलेल्या सर्व्हिसेसच्या अटी आणि नियम वाचत नाहीत. ही एक मोठी चूक आहे. त्यामुळे इन्शुरन्स घेताना सर्व पेपर्स काळजीपूर्वक वाचावेत. कंपन्या आपल्या वेबसाइटवर इन्शुरन्सशी संबंधित माहिती अपलोड करतात. तुम्ही वेबसाइटवरील अटी आणि नियम देखील वाचू शकता. पॉलिसीशी संलग्न कागदपत्रे पूर्ण वाचल्याशिवाय त्यावर स्वाक्षरी करू नका. इन्शुरन्स एजंट म्हणतात की, फक्त तुम्ही सही करा, बाकी ते स्वतः करतील. मात्र सर्व काही नीट वाचूनच सही करावी.

अचूक माहिती
जास्त प्रीमियम टाळण्यासाठी हेल्थ इन्शुरन्स घेताना आपण अनेकदा पूर्वीच्या आजारांची माहिती उघड करत नाही. बहुतेक लोकं धूम्रपान आणि मद्यपानाबद्दलची माहिती देखील शेअर करत नाहीत. या चुकांमुळे क्लेम फेटाळला जातो. म्हणूनच तुम्ही इन्शुरन्स कंपनीला आधीपासून अस्तित्वात असलेल्या आजाराची योग्य प्रकारे माहिती देणे अत्यंत आवश्यक आहे.

क्लेम करण्यात झालेला उशीर
क्लेम वेळेवर दाखल करावेत. घटनेनंतर लगेचच तुमचा क्लेम दाखल केला तर बरे होईल. बहुतेक कंपन्या तुम्हाला 7 दिवसांपासून ते 30 दिवसांचा वेळ देतात. दरम्यान, निश्चितपणे क्लेम दाखल करा.

मोटर इन्शुरन्समध्ये ‘ही’ गोष्ट लक्षात ठेवा
जर तुम्ही तुमच्या वाहनात काही बदल केले जसे की तुम्ही CNG किट बसवले असेल किंवा वाहनामध्ये काही बदल केले असतील तर त्याबद्दल आवश्यक असलेली माहिती इन्शुरन्स कंपनीला कळवा. ही माहिती देण्यात अयशस्वी झाल्यास तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो. हे लक्षात ठेवा की इन्शुरन्स कंपनी पॉलिसीमध्ये काही नुकसान कव्हर करत नाही. त्यासाठी वेगळे एड-ऑन कव्हर्स घ्यावेत जेणेकरून पुढे जायला अडचण येणार नाही.

इन्शुरन्स क्लेम नाकारण्याचे एक कारण म्हणजे इन्शुरन्स कंपनी पॉलिसीमध्ये काही नुकसान भरून काढत नाही. या तोट्यांसाठी स्वतंत्र एड-ऑन कव्हर घ्यावे लागतील. जर पॉलिसी इंजिनमध्ये बिघाड किंवा वाहनाला कालांतराने झालेल्या नुकसानासाठी कव्हर करत नसेल. त्यासाठी वेगळे इंजिन प्रोटेक्टर आणि झिरो डेप्रिसिएशन एड-ऑन कव्हर्स घ्यावेत.

Leave a Comment