ट्विटरवर का ट्रेंड होत आहे #mankagandhimafimange, त्यामागील कारण जाणून घ्या

नवी दिल्ली । भारतीय पशुवैद्यकीय संघटनेने (Indian Veterinary Association) उत्तर प्रदेशमधील सुलतानपूरच्या खासदार आणि प्राणी हक्क कार्यकर्त्या मेनका गांधी (Maneka Gandhi) यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये गांधींवर पशुवैद्यकीय डॉक्टरांना धमकावणे आणि अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय सोशल मीडियावरही गांधींविरूद्धचा ट्रेंड सुरू आहे. युझर्स सतत #mankagandhimafimange ट्विट करत आहेत.

मंगळवारी 22 जून रोजी लिहिलेल्या या पत्रात संघाने असे लिहिले की, मेनका गांधी सवयीने पशुवैद्यांना धमकी देत असतात ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. पत्राद्वारे त्यांनी असे लिहिले आहे की, यापूर्वीही संघाने त्यांना पशुवैद्यांविरूद्ध निंदनीय आणि अपमानकारक कमेंट टाळण्यास सांगितले होते. असोसिएशनने पंतप्रधान मोदींना या विषयाकडे लक्ष देण्यासाठी सांगितले आहे.

ट्विटर वर निषेध
सोशल मीडियावर युझर्स #MankaGandhiMafimange सतत ट्विट करत आहेत. युझर्स अशा प्रकारचे वक्तृत्व खपवून घेणार नाहीत. यासह, त्यांना पशुवैद्यांचा आदर करण्यास सांगितले जात आहे. तसेच 23 जून रोजी बुधवारी काळा दिवस साजरा करण्याचेही म्हटले आहे. यावेळी युझर्स ब्लॅक बँड बांधण्यासाठी आवाहन देखील करीत आहेत.

युझर्सचे ट्वीट येथे पहा-

कथित ऑडिओ व्हायरल होत आहे
सूत्रांच्या माहिती नुसार, मेनका गांधींचा एक ऑडिओ जिल्ह्यात लोकप्रिय झाला आहे ज्यामध्ये खासदार एका व्यक्तीला अटक करण्यासाठी सीतापूरचे कोतवाली प्रभारी (SO) यांना सुचना देताना ऐकू येतात. फोनवरून सूचना दिल्यानंतर सीतापूरच्या कोतवाली पोलिसांनी ग्वाल मंडी भागातील एका व्यक्तीला क्रूरता आणि प्राणी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

या ऑडिओमध्ये मेनका गांधी यांनी सीतापूर कोतवालीच्या एसओला अशा माणसाला अटक करण्याची सूचना दिली ज्याने कुत्र्याच्या पायाला काठीने मारून जखमी केले. या कथित ऑडिओनुसार मेनका यांनी एसओला न केवळ त्यांच्या वतीने आरोपीला चापट मारण्यास सांगितले मात्र त्याला कुत्र्याच्या दुखापतीवरील उपचारांचा खर्चही आरोपीने करावा असेही म्हंटले. परंतु, पोलिसांनी या ऑडिओच्या सत्यतेबाबत काहीही सांगण्यास नकार दिला.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like