पंतप्रधान मोदी गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे का वागतात? पृथ्वीराज चव्हाणांचा संतप्त सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातचा दौरा केला. तौत्के चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये मोठे नुकसान झाले आहे. गुजरातमध्ये समुद्र किनारपट्टीवर असलेल्या भागामध्ये तौत्के चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. यामुळे पंतप्रधान मोदींनी आज हवाई आढावा घेतला. तौक्ते चक्रिवादळाचा फटका महाराष्ट्राच्या किनारपट्टीलाही बसला आहे. मात्र पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राचा दौरा न केल्याने त्यांच्यावर जोरदार टिका होत आहे. यावरुन पंतप्रधान मोदी गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे का वागतात? असा संतप्त सवाल राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

तौक्ताय चक्रिवादळाने देशाची पश्चिम किनारपट्टी उध्वस्त केली. त्याचा परिणाम 5 राज्यांना झाला. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त गुजरातचा दौरा केला अन् केवळ गुजरातला आर्थिक मदत जाहीर केली. ते गुजरातच्या पंतप्रधानांसारखे का वागतात? इतर राज्यांतील लोकांकडे दुर्लक्ष का करायचे? असा प्रश्न चव्हाण यांनी विचारला आहे. चव्हाण यांनी ट्विट करुन आपलं मत नोंदवलं आहे.

मोदींचा महाराष्ट्रासोबत भेदभाव

तौत्के चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रालाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात तौत्के चक्रीवादळाने नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली आहे. यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अक्षेप घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तौत्के चक्रीवादळाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी दीव-दमण आणि गुजरातचा पाहणी दौरा करणार आहेत. परंतु महाराष्ट्रातही तौत्के चक्रीवादळ येऊन गेले आहे. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राता दौरा का करत नाहीत. हा महाराष्ट्राशी भेदभाव नाही का? असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

मोदींना महाराष्ट्रासाठी वेळ नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात दौऱ्यावर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. पंतप्रधान मोदींना महाराष्ट्राची पाहणी करण्यास वेळ नाही परंतु ते गुजरात- गोवा या राज्यात पाहणी दौरा करण्यास जात आहेत. अशी टीका नाना पटोले यांनी केली. महाराष्ट्रातही चक्रीवादळाचा फटका बसलाय त्यामुळे मोदींना महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त भागाचीही पाहणी करावी तसेच नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना जास्तीत जास्त मदत द्यावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

Leave a Comment