हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | माउंट एवरेस्ट हा आपल्या जगातील सगळ्यात उंच पर्वत आहे. तरी देखील अनेक लोकांनी माउंट एव्हरेस्ट चढण्याचा विक्रम केलेला आहे. परंतु कैलास पर्वत हा माउंट एव्हरेस्ट पेक्षा 2000 मीटरने कमी उंचीचा आहे. तरी देखील आजवर कोणताही व्यक्ती या कैलास पर्वतावर चढाई करू शकलेला नाही. याचे नक्की कारण काय आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोत. आजपर्यंत अनेक लोकांनी कैलास पर्वत चढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झालेला नाही. कारण या ठिकाणी चढाई करताना नेविगेशन करणे खूप अवघड असते. तसेच दिशा भरकटत जाते. आपला रस्ता चुकतो आणि येथे असलेल्या शक्तींमुळे दिशा निर्देशक बदलत असल्याचा दावा अनेक लोकांनी देखील केलेला आहे.
या सगळ्या कारणामुळे सध्या कैलास पर्वतावर चढाई करण्यासाठी सगळ्यांसाठी बंदी ठेवण्यात आलेली आहे. कारण अनेक लोकांचे असे म्हणणे आहे की, कैलास पर्वत आहे हे एक पवित्र स्थान आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कुणीही चढू नये. बौद्ध भिक्ष, योगी मिलो रेपा अकराव्या शतकात कैलास पर्वतावर चढाई केली होती. या पवित्र आणि रहस्यमय पर्वताला भेट देऊन परत जिवंत येणारा हा जगातील पहिला माणूस होता. असा देखील दावा करण्यात आलेला आहे. परंतु सध्या त्यावर कोणीही चढाई करू शकत.
या पर्वताचा उतारा 65° पेक्षा जास्त आहे. माऊंट एव्हरेस्टवर हा उतर 40 ते 60 अंशापर्यंत आहे. त्यामुळे अनेक मोठ मोठे गिर्यारोहक देखील या कैलास पर्वतावर चढण्यासाठी घाबरतात. या ठिकाणचे हवामान सतत बदलत असते. त्यामुळे हेलिकॉप्टर देखील इकडे तिकडे भरकटतात. चुकीच्या दिशेने वळतात आणि त्यांची दिशाभूल होते. तसेच या ठिकाणी असणाऱ्या हवामानामुळे मानवाची प्रकृती देखील बिघडते. कैलास पर्वत हा त्रिकोणी नसून चौकोनी आकाराचा आहे. त्यामुळे याला पर्वत सृष्टीचे केंद्र असे म्हणतात. त्याचप्रमाणे पुराणांमध्ये कैलास पर्वतावरती सोन्या, माणिक आणि स्पटिका यांचा साठा असल्याचे देखील सांगण्यात आलेले आहे.
कैलास पर्वत ही कोणतीही नैसर्गिक रचना नाही, तर एका अलौकिक शक्तीमुळे तयार झालेला हा पिरॅमिड आहे. याबद्दलची पुरानात देखील माहिती दिलेली आहे. कैलास पर्वता शंभर रहस्यमय पिरॅमिड पासून बनवलेला आहे. असा दावा देखील करण्यात आलेला आहे. हिंदू बौद्ध आणि जैन धर्मियांसाठी कैलास पर्वत हे एक पवित्र स्थान आहे. हिंदूच्या धार्मिक मान्यतेनुसार कैलास पर्वत हा भगवान शिवचे घर आहे. येथे मोक्षप्राप्ती होते. तसेच तिबेटी बौद्ध हे पविलास पर्वताला पृथ्वीवरील बौद्ध विश्व विज्ञानाचे केंद्रबिंदू मानतात. जैन धर्माचे संस्थापक वृषभ यांना येथे आध्यात्मिक जागृती मिळाल्याचा दावा देखील केला जात आहे त्यामुळे कैलास पर्वत हा सगळ्यांसाठी अत्यंत धार्मिक असे स्थळ आहे.