अवघ्या 2 दिवसांत सेन्सेक्स 1,000 अंकांनी का घसरला? यामागील कारण जाणून घ्या

नवी दिल्ली । गेल्या दोन दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात कमालीची घसरण झाली आहे. BSE सेन्सेक्स 1,000 हून जास्त अंकांनी घसरला आहे, तर निफ्टी 50 देखील याच कालावधीत 300 हून जास्त अंकांनी घसरला आहे. मध्यपूर्वेतील राजकीय तणावामुळे ऑइल मार्केटमध्ये भीतीचे वातावरण आहे आणि आता ही भीती शेअर बाजारातील घसरणीच्या रूपात दिसून आली. इकॉनॉमिक्स टाईम्समधील एका बातमीनुसार, आयटी, एफएमसीजी आणि फायनान्सिंग सेक्टरमध्ये विक्रीचा दबाव दिसून येत असताना, ऑटो आणि मेटलमध्ये खरेदी झाली आहे.

बुधवारी सेन्सेक्स 654 अंकांनी घसरून 60,098.82 वर बंद झाला. ही घट 1.08 टक्के होती. मात्र, दिवसभरात एक वेळ अशी आली की तो 920 अंकांपर्यंत घसरला. NSE निफ्टी आज 174 अंकांनी घसरला आणि तो 18 हजारांची महत्त्वाची पातळी तोडत 17,938.40 वर बंद झाला. या घसरणीत गुंतवणूकदारांचे 1.37 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

‘ही’ दोन प्रमुख कारणे आहेत
जियोजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे रिसर्च प्रमुख विनोद नायर म्हणाले की,”जागतिक स्तरावर वाढत्या महागाईच्या रूपात रिस्क सेंटिमेंट्सना फटका बसला, परिणामी सध्याचे राजकीय तणाव आणि तेलाच्या वाढत्या किमतींसह बॉण्ड यिल्ड वाढले आणि गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कमी झाला. FII च्या विक्रीमुळे देशांतर्गत बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली.

ब्लूचिप शेअर्समध्ये, ओएनजीसी 3.45 टक्क्यांच्या वाढीसह टॉप गेनर ठरला. टाटा मोटर्स, यूपीएल, मारुती सुझुकी, कोल इंडिया, एसबीआय, हिंदाल्को इंडस्ट्रीज, बजाज ऑटो, टाटा स्टील आणि इंडियन ऑइल इतर वाढीसह बंद झाले.

निफ्टीमध्ये इन्फोसिस 2.90 टक्क्यांच्या घसरणीसह टॉप लुझर घसरला. श्री सिमेंट, एशियन पेंट्स, अदानी पोर्ट्स, एचयूएल, ग्रासिम इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स आणि एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स यांचाही तोटा झाला.

ब्रॉडर मार्केट इंडेक्स संमिश्र राहिले. निफ्टी स्मॉलकॅप 0.01 टक्क्यांनी वाढला, तर निफ्टी मिडकॅप 0.06 टक्क्यांनी घसरला. निफ्टीचा ब्रॉडर इंडेक्स निफ्टी 500 देखील घसरला. तो 0.65 टक्क्यांनी घसरून बंद झाला.