पाचगणी प्रतिनिधी | सादिक सय्यद
शासनाने हाँटेल, लाँज, रेस्टॉरंट आदी व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे.परंतु गेली सात महिन्यांपासून बंद असलेला पर्यटन व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली नाही.यामुळे घोडे व व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे पर्यटन व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी अन्यथा आम्ही कायदा हातात घेऊन व्यवसाय सुरू करणार असल्याचे निवेदन टेबललँन्ड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर बगाडे,उपाध्यक्ष नामदेव चोपडे यांनी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांना दिले.
गेली सात महिन्यांपासून पर्यटन व्यवसाय बंद असल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या टेबललँन्ड पठारावरील सुमारे ६०० लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्याने मंगळवार दि.६ सप्टेंबर पासून व्यवसाय सुरु करण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे.अशा आशयाचे निवेदन आज सकाळी १२ च्या सुमारास मुख्याधिकारी यांना देण्यात आले.सकाळी साडेदहा पासूनच टेबललँन्ड नाक्यावर व्यावसायिक एकत्र येत होते. पावने बाराच्या सुमारास सर्व व्यावसायिक नगरपालिका कार्यालयासमोर एकत्र आले. पालिका कर्मचाऱ्यांनी व्यावसायिकांच्या पाच प्रतिनिधी यांनी कार्यालयात जाऊन निवेदन सादर करण्याची विनंती केली परंतु आम्ही आत येणार नाही.
मुख्याधिकाऱ्यानी गेटवर यावे हा पवित्रा घेतला. मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी गेटवर येऊन निवेदन स्विकारले व व्यावसायिकांच्या भावना समजून घेतल्या. व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळावी यासाठी जिल्हाधिकारी यांना विनंती करणार असल्याचे अश्वासन दिले. कायदेशीर परवानगीने व्यवसाय सुरू करावा अशी विनंती केली. सुधाकर बगाडे म्हणाले आम्ही या आगोदर दोन वेळा आपणास निवेदन दिले होते.परंतु आपल्याकडून काहीच उत्तर मिळाले नाही.व्यवसाय बंद असल्याने गंभीर परस्थिती निर्माण झाली आहे.शासनाने आम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी अन्यथा आम्ही उद्या सुरू करण्यात येणारे सर्व व्यवसाय एक दिवस पुढे ढकलत आहोत.कोणताही अनुसूचित प्रकार घडल्यास अथवा शांतता व सुव्यवस्था बिघडल्यास त्याला शासन सर्वस्वी जबाबदार राहील. असे निवेदनात नमूद केले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’