हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 15 जानेवारी रोजी राज्यामध्ये मकर संक्रांत मोठया उत्साहात साजरी केली जाईल. यादिवशी आपल्याला एक वाक्य नक्की ऐकायला भेटेल ते म्हणजे तीळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला. परंतु मकर संक्राती दिवशीच तीळ गूळ का वाटले जाते. तिळगुळ खाण्याचे नेमके फायदे काय आहेत. जाणून घेऊयात.
पौराणिक कथा
मकर संक्रांतीच्या कालावधी सूर्याच्या उत्तरेकडील प्रवासाची सुरुवात होते. त्यामुळे थंडी कमी होत उन्हाळ्याची चाहूल जाणवू लागते. असे मानतात की, तीळ अमरत्वाचे प्रतीक आहे. देव यमाने देखील अमरत्वाला आशीर्वाद दिला होता. तसेच, हिंदू धर्मात असे म्हटले जाते, ज्यावेळी भगवान विष्णू यांनी हिरणय कश्यपावर रागावले होते त्यावेळी त्यांना अत्यंत घाम फुटला होता. याचवेळी त्यांच्या घामाचे रूपांतर तिळामध्ये झाले होते.
गुळाचे महत्त्व
पौराणिक कथा असे सांगते की, गुळ दान केल्यावर सूर्य, शनी आणि गुरु ग्रहांचे कार्य शुभ होते. तसेच, गुळ खाल्याने सूर्यदेवाची कृपा राहते. याबरोबर, शनीची कृपा टिकून राहते. या सगळ्या पौराणिक कथा असल्या तरी तिळगुळ खाणे आरोग्यासाठी चांगले असते. तिळगुळ खाल्ल्यामुळे रक्तप्रवाह व्यवस्थित होतो. तसेच शरीरात उष्णता टिकून राहते.