Wednesday, October 5, 2022

Buy now

वहागाव येथील अनैतिक संबधातून पतीच्या खून प्रकरणात पत्नीला अटक

कराड | तालुक्यातील वहागाव येथे अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्याने युवकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून पत्नीचा प्रियकर रोहित पवार (रा. वहागाव, ता. कराड) याला तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आता मयत बरकत यांची पत्नी व रोहित याची प्रियसी शहनाज पटेल (वय- 27, रा. वहागाव, ता. कराड) हिलाही पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वहागाव बरकत खुद्दबुद्दीन पटेल (वय- 32, रा. वहागाव, ता. कराड) याचा खून झाला आहे. दिनांक 1 जून रोजी तळबीड पोलीस ठाण्यात बरकत पटेल बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती. दिनांक 28 मे पासून बरकत बेपत्ता असल्याचे म्हटले. सात दिवसापासून नातेवाईक बेपत्ता बरकत पटेल याचा शोध घेत होते. आज शुक्रवारी बरकत पटेल याची बहिण परवीन रमजान शेख हिने रोहित पवार यांच्या शेतातील ओघळ (ओढा) का मुजवली आहे, असा संशय व्यक्त केला. तसेच मुजवलेला ओढा उकरावा, अशी विनंती पोलिसांना केली होती. यानंतर तळबीड पोलिसांनी त्या ठिकाणची माती जेसीबीच्या सहाय्याने काढण्यास सुरुवात केली. रात्री उशिरा 8 वाजण्याच्या सुमारास 10 ते 15 फूट मातीखाली बरकत याचा मृतदेह सापडला होता.

बरकत यांच्या खूनप्रकरणी पत्नीशी अनैतिक संबध असल्याच्या माहितीवरून रोहित पवार याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पत्नी शहनाज हिचा या प्रकरणात काय संबध होता, यांचा तपास पोलिस करत होते. अखेर पोलिसांनी रात्री उशिरा शहनाज हिला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.