पतीला गर्लफ्रेंडसोबत पाहून भडकलेल्या पत्नीने भाजप नेत्याची रस्त्यावरच केली धुलाई

Mohit Sonkar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये भाजप नेते मोहित सोनकर (Mohit Sonkar) यांना भाजपच्या महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षांसोबत रोमान्स करणे चांगलेच महागात पडले आहे. भाजप नेते मोहित सोनकर (Mohit Sonkar) आणि भाजपच्या महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षा एका रूममध्ये असताना अचानक मोहित सोनकर (Mohit Sonkar) यांची पत्नी त्या ठिकाणी पोहोचली. यानंतर मोहितला (Mohit Sonkar) दुसऱ्या महिलेसोबत पाहून पत्नीचा पारा चांगलाच चढला. यानंतर पत्नीने मोहितला शिवीगाळ करत चपलेने मारहाण केली. ही घटना शनिवारी रात्री घडली आहे.

भाजप नेते मोहित सोनकर (Mohit Sonkar) यांना मारहाण होत असताना, पोलिसही तेथे आले. पण मोहितच्या पत्नीला इतका राग आलेला की तिने पोलिसांची पर्वा न करता पतीला मारहाण सुरूच ठेवली. मोहितची पत्नी आणि सासरच्या मंडळींनी मोहित यांच्यासोबत असलेल्या महिला नेत्यालाही मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

मोहित सोनकर (Mohit Sonkar) हे बुंदेलखंडचे प्रादेशिक मंत्री आहेत. 6 वर्षांपूर्वी त्यांचा मोनी सोनकरसोबत विवाह झाला होता. दोघांमधील संबंध चांगले नव्हते. दरम्यान त्यांना भाजपच्या एका महिला नेत्यासोबत पकडण्यात आले. यानंतर त्यांच्या पत्नीने आणि सासरच्या लोकांनी मिळून त्यांची चप्पने चांगलीच धुलाई केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!