नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशच्या माळवा या ठिकाणी एका महिलेने नवऱ्याला प्रेयसीसोबत नको त्या अवस्थेत रंगेहात पकडल्याने तिने चिडून नवऱ्याची चांगलीच धुलाई केली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर पतीची सुटका करण्यात आली आहे. माळवा येथील नागदा जंक्शन या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला आहे. या घटनेत एका महिलेने पोलीस आणि काही पत्रकारांसह एका घरावर धाड टाकली. त्या घरामध्ये त्या महिलेचा पती आणि त्याच्यासोबत त्याची प्रेयसी नको त्या अवस्थेमध्ये होती.
या महिलेने घराचा दरवाजा वाजवल्यानंतर महिलेच्या नवऱ्याने दरवाजा उघडला आणि तो बाहेर आला. महिलेच्या नवऱ्यापाठोपाठ त्याची प्रेयसीदेखील घराबाहेर आली. आपल्या नवऱ्यासोबत त्याच्या प्रेयसीला पाहून महिलेला राग अनावर झाला आणि तिने लाकडी दांडुक्याने नवऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर तिने नवऱ्याच्या प्रेयसीला देखील मारहाण करण्यास सुरुवात केली.
यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत पतीची सुटका केली. तसेच या महिलेला ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी महिलेला पोलीस स्टेशनला नेऊन तिची समजूत घातली आणि हे प्रकरण तिकडेच मिटवले. या दरम्यान तिकडे उपस्थित असणाऱ्या अनेकांनी हा सर्व प्रकार मोबाईलवर चित्रीत केला होता.