धक्कादायक ! अवैध संबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीची भररस्त्यात हत्या

सोनीपत : हॅलो महाराष्ट्र – हरयाणाच्या सोनीपतमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये लिवान गावात राहणाऱ्या जॉनी नावाच्या एका व्यक्तीचे गावातील एका महिलेसोबत अवैध संबंध होते. मात्र त्याच्या पत्नीमुळे अवैध संबंधात अडसर येत होता. यानंतर आरोपी जॉनीने आपल्या पत्नीला रस्त्यातून हटवण्याचा प्लॅन केला. रविवारी तो आपल्या पत्नीसोबत गावात निघाला. यावेळी त्याने सेक्टर 4 स्थित हॉकी ग्राऊंडजवळ आपल्या पत्नीची हत्या केली. यानंतर त्याने हत्येला अपघाताचं रुप देण्याचा प्रयत्न केला.

यानंतर या महिलेच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून पतीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या आरोपी पतीचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जॉनीचं लग्न जसोर खेडी येथील राहणाऱ्या मंजुसोबत 2007 मध्ये झालं होतं. मात्र जॉनीचे गावाकडे राहणाऱ्या एका महिलेसोबत अवैध संबंध होते. मंजुला दोघांमधील हे नातं आवडत नव्हतं.

या गोष्टीवरून मंजूचे आणि आरोपी पती याच्याबरोबर सतत भांडण होत होते. मात्र जॉनी कायम मंजूला रस्त्यातून हटवण्याचा प्लान करीत होता. घटनेच्या दिवशी ठरलेल्या प्लॅननुसार जॉन मंजूला बाईकवरुन घेऊन गेला. यानंतर त्याने गावाबाहेर जाताच जॉनीने आपली बाईक लांब पार्क केली आणि त्यानंतर त्याने आपल्या पत्नीच्या गळ्यावर आणि पोटावर धारदार शस्त्राने वार करून तिची निर्घुणपणे हत्या केली.