भावोजीसोबत पत्नीने केलेल्या ‘त्या’ कृत्यामुळे पतीने उचलले टोकाचे पाऊल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सीकर : वृत्तसंस्था – एका युवकाने बायकोच्या आणि तिच्या भावोजीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत युवकाची पत्नी आणि तिच्या भावोजीविरोधात गुन्हा दाखल करून त्या दोघांना अटक केली आहे. आरोपी पत्नीने एका लग्नात तिच्या भावोजीसोबत एकत्र फोटो काढला होता. पत्नीचे हे वागणे सहन न झाल्याने पीडित तरुणाने टोकाचे पाऊल उचलत घराजवळच्या मंदिराच्या पाठिमागे असणाऱ्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण
आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव दिनेश आहे. तो राजस्थानातील सीकर जिल्ह्यातील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी मृत दिनेशच्या पत्नीने एका लग्नामध्ये तिच्या भावोजीच्या मांडीवर बसून फोटो काढला होता.यामुळे दिनेशला आपल्या पत्नीवरचा राग अनावर झाला होता. या घटनेनंतर दिनेश आणि त्याच्या पत्नीत सतत भांडणे होऊ लागली.

यामुळे मृत दिनेशच्या पत्नीने आपल्या भावोजीच्या मदतीने नवऱ्यावर खोटा गुन्हा दाखल करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला. आरोपी पत्नी आणि भावोजी कृष्णा जाट याने दिनेशच्या सावत्र मुलीच्या मदतीने पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केला. यानंतर पत्नीच्या आणि तिच्या भावोजीच्या सततच्या त्रासाला कंटाळून दिनेशने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पोलीसांनी आत्महत्येस प्रवृत केल्याच्या आरोपीखाली दोन्ही आरोपींना अटक केली आहे. फतेहपुर शेखावाटी पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.

Leave a Comment