विवाहबाह्य संबंध लपविण्यासाठी तिने केला असा मोठा प्रताप..

फरिदाबाद | आपले विवाहबाह्य संबंध लपवण्यासाठी लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात. एका महिलेने तिचे विवाहबाह्य संबंध लपविण्यासाठी प्रियकर आणि इतर तिघांच्या मदतीने पतीचा खून केला आहे. पतीचा खून करून त्याचा मृतदेह बॉक्समध्ये भरून घरातच आठ दिवस लपवून ठेवला. नंतर तो मृतदेह नाल्यामध्ये फेकण्यात आला.

फरिदाबाद येथील सैनिक कॉलनीमध्ये दिनेश आणि त्याची पत्नी राहत होते. पत्नीचे प्रियकर नितीन सोबत विवाहबाह्य संबंध होते. विवाहबाह्य संबंधात अडचण येत असल्यामुळे पत्नीने प्रियकराच्या आणि इतर तिघांच्या मदतीने पती दिनेशचा खून केला. आणि मृतदेह बॉक्समध्ये भरून घरातच आठ दिवस लपवून ठेवला. नंतर नाल्यात फेकून दिला.

पोलिसांना मृतदेह सापडल्यानंतर त्यांनी पत्नीला मृतदेह ओळखण्यासाठी बोलावले असता तिने मृतदेह तिच्या पतीच्या नसल्याचे सांगितले. पण दिनेशच्या मित्राने मृतदेह ओळखला. यानंतर शंका आल्यामुळे पोलिसांनी पत्नीची कसून चौकशी केल्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली.

You might also like