पत्नी ठार, पती जखमी : पुणे – बंगलोर महामार्गावर कंटेनर- दुचाकीचा भीषण अपघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोल नाका येथे आज दि. 28 रोजी रविवारी सकाळी कंटेनर व दुचाकीचा जोरदार अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीवरील महिलेला फरफटत नेल्याने ती जागीच ठार झाली. पत्नी विद्या मधुकर पटवर्धन (वय- 65, रा. मिरज- सांगली) असे जागीच ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तर मयत महिलेचे पती मधुकर गोविंद पटवर्धन जखमी झालेले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आनेवाडी टोलनाक्याजवळ विरवाडे गावच्या हद्दीत रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. पटवर्धन दाम्पत्य दुचाकीवरून (क्र. एनएल- 01 क्यु- 6794) पुण्याच्या दिशेला निघाले होते. त्यावेळी दुचाकीला विरमाडे गावच्या हद्दीत कंटेनरने पाठीमागून धडक दिली. कंटेनरने दुचाकीला फरफटत नेले.

दरम्यान, अपघाताची माहिती भुईंज पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत दुचाकीस्वार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघातात पत्नी जागीच ठार झाली असून पती जखमी झालेले आहेत. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक खोळंबली होती, पोलिसांनी ती तात्काळ सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

Leave a Comment