लाॅकडाउनमध्ये पत्नीचा १० हजारात केला २ तासांसाठी सौदा! पुढे झालं असं काही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊनच्या दरम्यान, उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने पैशासाठी आपल्या पत्नीचा सौदा केला. ज्याने महिलेला विकत घेतले त्याने तिला ओलीस ठेवून तीन दिवस तिच्यावर बलात्कार केला. आरोपी पती स्वत: पोलिसात जाऊन पत्नी हरवल्याचा रिपोर्ट करण्यासाठी गेला असता प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी आरोपी पतीला अटक केली आहे. पोलिस या घटनेत सामील झालेल्या दोन मध्यस्थ आणि बलात्कार केलेल्या आरोपीला शोधत आहेत.

हि घटना उत्तर प्रदेशमधील मुरादाबादच्या पाकबाडा पोलिस स्टेशन क्षेत्राशी संबंधित आहे. येथे, एका व्यक्तीने स्वत:च्या पत्नीला दहा हजारांमध्ये दोन तासांसाठी दुसऱ्याला विकणाऱ्या नवऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस अद्यापही या घटनेत सामील झालेल्या दोन मध्यस्थ आणि बलात्कार केलेल्या आरोपीला शोधत आहेत. त्यातील एक संभळ येथील रहिवासी आहे. पाकबाडा पोलिस स्टेशनचे प्रभारी सुरेंद्र पाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील हसंपूर चौरस येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने आपली पत्नी घरातून बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली होती. यानंतर पोलिस त्या महिलेचा शोध घेत होते.

महिलेचे बोलणे ऐकून पोलिस झाले हैराण
स्टेशन प्रभारीच्या म्हणण्यानुसार, संभळमधील गुन्नोर पोलिस स्टेशन भागात या महिलेचे लोकेशन आढळले. पाकबाडा पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले. या महिलेची चौकशी केली असता पोलिसही आश्चर्यचकित झाले. खरं तर महिलेने सांगितले की ती हरवलेली नाही, तर तिच्या नवऱ्याने तिला दहा हजार रुपयांना विकले होते. त्या महिलेने पोलिसांना सांगितले की, मध्यस्थाची भूमिका पाकबडा येथे राहणारा खालिद याने पार पडली. खालिदनेच गुन्नौर येथे राहणाऱ्या कळवाच्या भावाशी तिचा सौदा केला होता.

तीन दिवस ओलीस ठेवले आणि बलात्कार केला
या महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपीने तिला बंधक बनवून ठेवले आणि तीन दिवस तिच्यावर बलात्कार केला. या पीडितेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी महिलेच्या साक्षीच्या आधारे पतीसह तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली. त्याचवेळी संभळ येथील रहिवासी आणि पाकबड्यातील मध्यस्थ कळवाचा धाकटा भाऊ खालिद याच्या शोधात छापेमारी सुरू आहे. पोलिस स्टेशनचे प्रभारी म्हणाले की पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्याचबरोबर लवकरच आरोपींनाही अटक केली जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

धक्कादायक! वेश्या व्यवसायातून पुणे विद्यापीठातील दोन विद्यार्थिनींची सुटका

धक्कादायक! विवाहितेवर बलात्कार करून केले व्हिडीओ शुटिंग

अल्पवयीन मुलीवर केले अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार

लज्जास्पद! नांदेडमध्ये शिक्षकांनीच केला सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार

उझबेकिस्तानमध्ये बसून ‘ती’ मुंबईत चालवायची SEX रेकेट; ८० हजार रेट!

Leave a Comment