अहमदनगर प्रतिनिधी । सुशील थोरात
अवघ्या तीन दिवसांपूर्वी लग्न झालेले नवदाम्पत्य पाथर्डी तालुक्यातील मढी येथे देवदर्शनासाठी आले. मात्र दर्शन घेऊन परत जात असतानाच नवरी मुलगी प्रियकरासोबत पळून गेली. हे पलायन नाट्य मात्र देवस्थानच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले झाले असून पाथर्डी तालुक्यात हा एक मोठा चर्चेचा विषय झाला आहे
शेवगाव तालुक्यातील एका तरुणाचा तीन दिवसांपूर्वी विवाह झाला होता त्यानंतर देवदर्शनासाठी नवदाम्पत्य टू व्हीलर वर मढी येथे आले होते मुलीचे आल्यानंतर दोघांनी मिळून नाथांचे दर्शनही घेतले मात्र दर्शन घेतल्यानंतर आपली गाडी पार्किंग मधून घेऊन येतो असे म्हणत तरुण पार्किंग कडे गेला मात्र जेव्हा तो गाडी घेऊन मंदिराच्या गेटपाशी आला तेव्हा त्याची पत्नी त्याला तिथे दिसलीच नाही तिथे असलेल्या दुकानदारांकडे चौकशी केली असता गर्दीमुळे कोणाच्याच लक्षात काही आले नव्हते मात्र जेव्हा सीसीटीव्ही फुटेज भेटले तेव्हा धक्कादायक प्रकार लक्षात आला असून नववधु आपल्या प्रियकराबरोबर पळून गेल्याचं त्यामध्ये दिसून येते .
ही वधू जेव्हा मढी येथे दर्शनासाठी आली होती तिच्या पाठोपाठ तिचा प्रियकर आला होता मात्र दोघांनी हे कृत्य ठरवून केल्याचं दिसतंय कारण जेव्हा नवविवाहित तरुण पार्किंग कडे गाडी आणण्यासाठी गेला तेव्हा लगेच मागून आलेल्या प्रियकरासोबत तरुणी त्याच्या गाडीवर बसून फरार झाली मात्र या घटनेने नवीनच लग्न झालेल्या तरुणाला चांगलाच धक्का बसलाय तर दोघांचे घरचेही याबाबत अनभिज्ञ असल्याने त्यांनाही मोठा धक्का बसलाय आयुष्य मात्र मोठा चर्चेचा झालाय