व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

परभणी हादरलं ! एकाच खोलीत पलंगावर पत्नीचा मृतदेह तर पतीची गळफास घेऊन आत्महत्या

परभणी : हॅलो महाराष्ट्र – परभणी जिल्ह्यातील सेलू शहरात मोठी खळबळजनक घटना घडली आहे. यामध्ये एकाच खोलीत पती आणि पत्नीचे मृतदेह आढळून आले आहेत. घरातील पलंगावर पत्नीचा मृतदेह तर गळफास घेतलेल्या अवस्थेतमध्ये पतीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
सेलू शहरातील राजीव गांधीनगर भागात राहणाऱ्या अर्जुन गणेश आवटे आणि त्याची पत्नी प्रियंका आवटे या दोघांचे मृतदेह त्यांच्या खोलीमध्ये आढळून आले. प्रियांका हिचा मृतदेह घरातील पलंगावर आढळून आला तर त्याच रूममध्ये लोखंडी पत्र्याच्या पाईपाला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेतमध्ये अर्जुन याचा मृतदेह आढळू आला. घटनेच्या दुसऱ्या दिवशी अर्जुन यांच्या बहिणीने सकाळ झाली तरी घराचा दरवाजा न उघडल्याने रूमची कडी वाजवली मात्र आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. यानंतर अर्जुन यांच्या बहिणीने आपल्या वडिलांना याची माहिती दिली. यानंतर त्यांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता हे भयानक दृश्य आढळून आले.

अर्जुन आणि प्रियंका यांचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. अर्जुन हा ऑटोरिक्षा चालवून आपली उपजीविका भागवत होता. तर प्रियांका गृहिणीची भूमिका पार पाडत होती. या दाम्पत्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले हे अजून समजू शकलेले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी अर्जुन आणि प्रियंका यांचा मृतदेह पुढील तपासणीसाठी सेलू येथील शासकीय रुग्णालयामध्ये पाठवला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दोघांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा तपास पोलीस करत आहेत.