जंगली डुकराचा शेतकरी मुलावर जबर हल्ला ; प्रसंगावधान दाखवत शेतकऱ्याने वाचवले मुलाचे प्राण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती । वडिलांसोबत शेतातुन चारा घेऊन परत येत असणार्‍या एका अल्पवयीन मुलावर जंगली डुकराने जबर हल्ला करून त्याला घायाळ केले आहे. तेथीलच एका शेतकऱ्याने प्रसंगावधान दाखवत दगड फेकून मारल्याने त्या मुलाचे प्राण वाचल्याची, अंगाला थरकाप सोडनारी घटना घडली आहे. ही घटना काल सायंकाळी अमरावती जिल्हातील अचलपूर तालुक्याच्या शिंदी बुद्रुक येथे घडली आहे.

कृष्णा दिलीप माहुरे वय तेरा वर्षे असे डुकराच्या हल्ल्यात घायाळ झालेल्या मुलाचे नाव आहे. तो आपल्या वडिलांसोबत तो शेतात गेला होता. पाळीव जनावरांसाठी चारा डोक्यावर घेऊन परत येत असताना गावाजवळच्या शेतातील एका डबक्यातुन येत जंगली डुक्कराने अचानक
कृष्णावर हल्ला चढविला. डूकराने कृष्णाच्या डोक्याला, मांडीला, पोटाला, कमरेला तसेच डोक्याला जबर चावा घेऊन त्याला जबर जखमी केले.

एका शेतकऱ्याने हा प्रकार पाहिला आणि ताबडतोब मुलाचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी त्या डुकराला दगड फेकून मारले. अखेर ते डुक्कर जंगलात पळून गेले. गंभीर जखमी अवस्थेत कृष्णाला अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथेच त्याचावर ऊपचार सुरू आहेत .

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment