महाबळेश्वरच्या वेण्णालेक परिसरात रानगव्याचे दर्शन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

महाराष्ट्राचे मिनी कश्मीर असलेल्या महाबळेश्वरमध्ये गुलाबी थंडीचा आस्वाद घ्यायला पर्यटक दाखल होत आहेत. महाबळेश्वरच्या निसर्गरम्य वातावरणात अनेक वन्य प्राण्यांचा अधिवास आहे. अलीकडच्या दिवसात या वन्य प्राण्यांचा लोक वस्तीकडे शिरकाव होऊ लागला आहे. महाबळेश्वरच्या प्रसिद्ध वेण्णालेक समोरील रस्त्यावर रानगव्याचे आज पर्यटकांना दर्शन झाले.

वेण्णालेक येथील रस्त्यावर रानगव्यांचा मुक्त संचार आज सकाळी पर्यटकांना पाहायला मिळाला. हा गवा रस्त्याने महाबळेश्वर शहराच्या दिशेने चालत निघालेला पाहायला मिळाला. यावेळी समोरून कारमधून आलेल्या पर्यटकांची चांगलीच भंबेरी उडाली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना ही माहिती समजल्यानंतर त्यांनी तात्काळ या गव्याला जंगलाच्या दिशेने हाकलले.

गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढत चालला आहे. प्रसिद्ध वेण्णा तलाव परिसरात तर थंडी अधिकच जाणवत असल्यामुळे पर्यटकांची पावले या परिसराकडे वळू लागली आहेत. वेण्णा लेकवर स्थानिक नागरिकांसह पर्यटक दिवसभर उबदार गरम कपडे,शाली, स्वेटर्स घालून फिरताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवून त्याभोवती नागरिक शेकत बसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. अशात रानगवे आता मानवी वस्तीत येऊ लागले आहेत.