हत्तीची शिकार करणं सिंहिणीला पडलं भारी ; गजराजनं घडवली चांगलीच अद्दल ( Video )

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जंगलामध्ये स्वतःचं पोट भागवण्यासाठी अनेकदा जंगली प्राणी एकमेकांची शिकार करतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एका सिंहीनीने चक्क हत्तीशी पंगा घेतला आहे. मात्र हा पंगा तिच्याच अंगलटी आल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक सिंहीण तिची सर्व शक्ती पणाला लावून हत्तीवर हल्ला करताना दिसते. सिंहिणीनं हत्तीच्या पाठीवर उडी मारली आहे, आणि ती सर्व शक्ती लावून हत्तीला मारण्याचा प्रयत्न करत आहे. या हल्ल्यानंतर हत्तीनं शरणागती पत्कारलेली नाही. तो देखील जीव वाचवण्यासाठी लढाई करण्यासाठी सज्ज झाला आहे.

हत्तीनं सोंडेच्या मदतीनं पाठीवर बसलेल्या सिंहिणीला खाली टाकून दिलं. त्यानंतरही सिंहीण शिकारीचा प्रयत्न सोडत नाही. ती हत्तीच्या सोंडेजवळ जावून त्याला चावण्याचा प्रयत्न करते. पण, बलाढ्य हत्तीसमोर तिची शक्ती कमी पडते. त्यानंतर हत्ती सिंहिणीला तिच्या सोंडवर लटाकावून नेतो आणि जमिनीमध्ये दाबण्याचा प्रयत्न करतो.

हत्तीचं हे रौद्र रुप पाहून सिंहिणीला माघार घेण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो. ती जीव वाचवण्यासाठी पळत सुटते. त्यानंतरही हत्ती तिचा पाठलाग करतो असं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment