हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डिजिटल क्रांतीने भारतीय बँकिंग क्षेत्रात मोठा बदल होताना दिसणार आहे. कारण आता लोक मोठ्याप्रमाणात पारंपारिक एटीएमच्या वापर करण्याऐवजी ऑनलाईन माध्यमांचा वापर करत आहेत. त्यामुळे एटीएमच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या वर्षभरात देशभरात सुमारे 4 हजार ATM बंद करण्यात आली आहेत. या घटनेचे मुख्य कारण म्हणजे डिजिटल पेमेंट्सच्या वापरात झालेली प्रचंड वाढ. आजकाल ग्राहक क्यूआर कोड, यूपीआय अन अन्य डिजिटल पेमेंट्सचा वापर करत आहेत, ज्यामुळे त्यांना कॅश काढण्याची आवश्यकता कमी झाली आहे. त्याचाच परिणाम ATM मशिनवर होणार आहे .
ATM बंद होणार ? –
ग्राहक आता किराणा दुकानदारांपासून भाजीवाल्यापर्यंत सर्वत्र क्यूआर कोड किंवा यूपीआयच्या माध्यमातून पेमेंट करत आहेत. या बदलामुळे एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी रांगेत उभे राहण्याची आवश्यकता कमी झाली आहे. “लहान रक्कमेचा व्यवहारसुद्धा डिजिटल मार्गाने केला जात आहे. मोबाईल फोन अन इंटरनेटच्या साधनांद्वारे अनेक ग्राहक ऑनलाईन पेमेंट्स करू लागले आहेत. एटीएमवरील अवलंबन कमी झाल्यामुळे बँका देखील एटीएम ऑपरेशनमध्ये कमी खर्च करण्याची पद्धत स्वीकारत आहेत.
डिजिटल पेमेंट्सचा वाढत वापर –
जर हि डिजिटल पेमेंट्सची स्थिती अशीच राहिली , तर भविष्यात एकही ATM दिसणार नाही . अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. डिजिटल पेमेंट्ससाठी इंटरनेट सेवा, स्मार्टफोन आणि डिजिटल सुरक्षा यांसारख्या काही आव्हानांचा सामना करावा लागतो. ग्रामीण क्षेत्रातील काही लोक अजूनही या तंत्रज्ञानास पूर्णपणे स्वीकारलेले नाहीत. अशा स्थितीत, एटीएमचे पूर्णपणे बंद होणे लवकरच शक्य होईल का, याबद्दल काही अनिश्चितता आहे.