कोरोना संकटात मदत करण्यासाठी भारतात परतणार का? रघुराम राजन म्हणतात…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले की कोरोना व्हायरसमुळे भारताचे होणारे मोठे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी नेहमीच साथ देईल.एनडीटीव्हीनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या गोष्टी सांगितल्या. जेव्हा त्यांना विचारले गेले की कोरोना साथीच्या वेळी आलेल्या या आर्थिक परिस्थितीत मदत करण्यासाठी ते भारतात परतणार का? यावर ते म्हणाले की उत्तर अगदी सोपे आहे. जर भारताने मदतीची मागणी केली तर मी येण्यास तयार आहे.आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आधीच सांगितले आहे की त्यांच्यासाठी कोणतीही संधी आल्यास ते भारतात परतण्यास तयार आहेत.

रघुराम राजन हे ३ वर्षांचा आरबीआय बँकेच्या गव्हर्नर पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर शिकागो विद्यापीठात प्राध्यापक झाले आहेत. आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांचा कार्यकाळ सप्टेंबर २०१६ मध्ये संपला.

आर्थिक सुधारणा केव्हा होईल? – आरबीआयचे माजी गव्हर्नर म्हणाले की नक्कीच जग जवळजवळ एका मंदीच्या स्थितीत आलं आहे. मला आशा आहे की पुढील वर्षी आम्हाला आर्थिक सुधारणा करण्याची संधी मिळेल, परंतु हे सर्व आर्थिक सुधारणेसाठी घेतलेल्या स्टेप्सवर अवलंबून असेल.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे भारतासह देशातील अर्थव्यवस्थांची स्थिती अत्यंत बिकट बनली आहे. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) एक बाह्य सल्लागार गट तयार केला आहे. या गटात भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचादेखील समावेश आहे.

भारताची अर्थव्यवस्थेची स्थिति कशी आहे? – राजन म्हणतात, ‘भारतातील अडचणींचे पहिले संकेत बहुतेक वेळेस परकीय चलनातून होते, परंतु अन्य उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत आतापर्यंत भारताचे चलन खाली आले नाही आहे. आरबीआयने बर्‍याच अंशी हे हाताळले आहे. तथापि, आपल्याला माहिती आहे की ब्राझीलसारख्या देशांच्या चलनात २५ टक्के घट झाली आहे. आपण त्या वाईट स्थितीत नाही आहोत.

IMF MD ropes in Raghuram Rajan, 11 others to key external advisory ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment