औरंगाबाद | संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी मनपा पुन्हा कोरोना चाचण्यांवर भर देणार आहे. सध्या शहरात अँटीजन व आरटीपीसीआर म्हणून अडीच हजारापर्यंत चाचण्या केला जात आहे ही संख्या पाच हजारापर्यंत लिहून सुपर स्पेडर गटांच्या चाचण्या वाढविल्या जातील अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली आहे.
कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेत संसर्ग पसरण्याचा धोका अधिक असल्याची भीती तज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे पालिकेने शहराच्या इंट्री पॉईंटवरील चाचण्या अजूनही सुरूच ठेवल्या आहेत याशिवाय आरोग्य केंद्रे 9 सरकारी कार्यालयासह विमानतळ रेल्वे स्टेशन येथे नियमित चाचण्या सुरू आहेत.
तिसऱ्या लाटेपासून संरक्षण करण्यासाठी सुपर स्पेडर गटातील अर्थात ज्यांचा अधिक लोकांशी संपर्क येतो कारखान्यातील कामगार दुकानदार सरकारी कर्मचारी आदींच्या चाचण्या करण्याचे नियोजन पालिकेने सुरू केले आहे असे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले. संसर्ग रोखण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून एकूण परिस्थितीचा रोज आढावा घेण्याचे काम सुरू असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली.