टोल देणार नाही अन् पासही घेणार नाही : पुणे- बेंगलोर महामार्गावर स्थानिक आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
तासवडे टोलनाका परिसरातील 10 गावांना टोल देणार नाही अन् पास घेणार नाही, अशा घोषणा स्थानिकांनी आज टोलनाक्यावर दिल्या. यावेळी मोठ्या प्रमाणावर स्थानिक जमा होवून त्यांनी निदर्शने केली. तसेच पूर्वीप्रमाणे आरसीबुकवरून गाड्यांना सोडावे व स्थानिक नागरिकांसाठी सेपरेट लेन राखीव ठेवावी अशी मागणी लोकांनी केली.

पुणे- बेंगलोर महामार्गावर असलेल्या तासवडे टोलनाक्यावर आज स्थानिकांनी आंदोलन केले. यामध्ये तासवडे, वराडे, बेलवडे, शिरवडे, वहागांव, घोणशी, तळबीड, नडशी, हनुमानवाडी व उंब्रज या 10 गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. टोल नाका प्रशासनाकडून यापूर्वी या गावातील लोकांना टोल आकारला जात नव्हता. परंतु आता मासिक पास घ्यावा, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिकांना अर्थिक भुर्दंड बसणार आहे. या प्रकाराचा आज परिसरातील स्थानिकांनी रस्त्यावर उतरत विरोध केला.

तासवडे टोलनाका परिसरातील दहा गावांना यापूर्वी टोल आकारला जात नव्हता. आता 310 रूपयांचा मासिक पास घ्यावा, असे फर्मान नवे व्यवस्थापन आलेले सांगत आहे. या पासला व टोलला स्थानिकांचा विरोध राहिल. आज संयमाने लोकांनी उतरून विरोध दर्शविला आहे. पुढील काळात आक्रमक पध्दतीने याचा निषेध केला जाईल, यांची नोद टोल व्यवस्थापनाने घ्यावी, असे स्थानिकांनी सांगितले.