तहसील कार्यालयातील लाच प्रकरणातील ‘तो’ अधिकारी सापडणार की सुटणार?

0
244
Karad Tehsil Office
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील
तहसील कार्यालयातील लोकसेवक लाचलुचपतच्या कारवाईत सापडला. त्याला 2 दिवसांची पोलिस कोठडीही सुनावली. आता तो लाच प्रकरणातील संबधित अधिकारी सापडणार की सुटणार याकडे प्रशासकीय सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रकरणामुळे सध्या वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. अनेक रंजक गोष्टीही चर्चिल्या जावू लागल्या आहेत. त्यामुळे लाचलुचपत विभागाने केलेल्या या कारवाईमुळे नक्की कोण- कोण अडकणार की लोकसेवकांवर निभावणार अशा चर्चा आता दबक्या आवाजात सुरू आहेत.

कराड तहसील कार्यालयात कुणबी जातीचा दाखला देण्यासाठी चक्क 50 हजारांच्या लाचेची मागणी केली गेली. तेव्हा लोकसेवक विक्रम शिवदास याने कोणत्या अधिकाऱ्यांच्या भरोवशावर ही मागणी केली होती. कारण विक्रम शिवदास अनेक वर्ष तहसील कार्यालयात काम करत आहे, त्यांचा चांगलाच वावर आहे. परंतु याला कोणत्या अधिकाऱ्यांचा आशिर्वाद आहे. आता तो अधिकारी समोर येणार की विक्रम यांच्यावर सर्व प्रकरण शेकणार हेही पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे या लाच प्रकरणातील तो बडा मासा सुटणार की अडकणार, हा एकच प्रश्न आता सर्वसमान्यांसह प्रशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना पडला आहे.

वढ्याचं तेल वांग्यावर निघणार?
कराड तहसील कार्यालयात लाच मागण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे, असे नाही. परंतु लोकसेवक सापडल्यानंतर त्याने संबधित अधिकाऱ्यांचा उल्लेख केला. तो अधिकारी कोण, त्याचा नक्की यामध्ये काय रोल आहे. आता तो अधिकारी कुठे आहे. त्या अधिकाऱ्यांच्याबाबत अनेक रंजक गोष्टी सांगितल्या जावू लागल्या आहेत. त्याचाही निपटारा लागणार की वढ्याचं तेल वांग्यावर निघणार असाही सवाल उपस्थित केला जावू लागला आहे. (उद्या वाचा… जातीच्या दाखल्यासाठी कनेक्शन कुठंपर्यत?)