non-gazetted रेल्वे कर्मचाऱ्यांना सरकार देणार बोनस; सत्य काय आहे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडिया वर एक बातमी व्हायरल होत आहे, सरकार आता non-gazetted railway employees ना बोनस देणार आहे. ही बातमी सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होते आहे. या बातमीतील सर्वेक्षणानुसार, सरकार 2019-2020 मधील non-gazetted रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रोडक्टिविटी लिंक्ड बोनस देतील. याआधी एक बनावट बातमी व्हायरल झाली होती ज्यामध्ये सांगितले गेले होते की, रेल्वे यावर्षी आपल्या कर्मचाऱ्यांना सॅलरी देणार नाही. चला तर मग या बातमीचे सत्य काय आहे ते जाणून घेउयात …

सत्य काय आहे?
या बातमीची माहिती देताना तुम्हांला सांगू की, ही बातमी खोटी आहे. याच्याशी निगडित कोणतीही बातमी कोणत्याही वेबसाइटवर आलेली नाही आहे. पीआयबीच्या कडूनही या बातमीची तपासणी करताना सांगितले गेले आहे की, रेल्वे रेल्वेने असा कोणताही आदेश जारी केला नाही. त्यांच्याकडून हे सांगितले गेले आहे की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही बातमी चुकीची आहे.

या आधी देखील एक बातमी व्हायरल झाली होती की, यावर्षी रेल्वे आपल्या कर्मचाऱ्यांना सॅलरी देणार नाही. आर्थिक नुकसान झाल्यामुळे रेल्वेने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले होते. प्रयत्न केला. मात्र हा दावादेखील खोटा ठरला.

भारतीय रेल्वेचे पूर्णपणे खासगीकरण होणार
अशी आणखी एक बातमी व्हायरल झाली होती, ज्यामध्ये सांगितले गेले की, भारतीय रेल्वेचे पूर्णपणे खासगीकरण होणार आहे. या खाजगीकरण प्रक्रियेत नोकरकपात चालू आहे. भारत सरकारचे अधिकृत ट्विटर हॅन्डल असलेले पीआयबी फॅक्ट चेकने भारतीय रेल्वेच्या खाजगीकरणाच्या दाव्याविषयी सांगितले गेले, ‘ही बातमी बनावट आहे ! काही असे सेक्टर आहे जिथे पब्लिक-प्रायवेट पार्टनरशिपवर काम चालू आहे, मात्र त्याचे नियंत्रण अद्यापही रेल्वेकडे आहे. त्यामुळे हे कळून गेले आहे की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही बातमी चुकीची आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment