आजच्या शिक्षण व्यवस्थेच्या चक्रव्यूहात अडकलेला विद्यार्थ्याला बाहेर काढणारा ‘अभिमन्यू शिक्षक’ मिळेल का ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद/ प्राची नाईक उंडणगावकर – “गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः” गुरू म्हणजे साक्षात ब्रम्ह, गुरू म्हणजे विष्णु, गुरू म्हणजेच महादेव आणि गुरु म्हणजेच साक्षात परब्रह्म. कारण एकमेव गुरु असतो जो आपल्याला अंधारातून प्रकाश मार्गाकडे जाण्याचा रस्ता दाखवत असतो. म्हणूनच गुरूला सर्वशक्तिमान अशी उपाधी मिळाली आहे. आज 5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. हाच दिवस हा शिक्षक दीन म्हणून साजरा केला जातो.
‌‌
‌‌”मातृ देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव!” आईच्य गर्भातच आपल्यावर तिच्याकडून संस्कार होत असतात.जन्मल्यानंतरचे सर्वच बाह्यज्ञान हे आई-वडील आपल्याला देतात. ह्याच शिक्षणाचा पुढचा प्रवासासाठी गरज असते ती दुसऱ्या गुरू ची आणि तेच गुरू म्हणजे घर आपले शिक्षक. शिक्षकाच्या भूमिकेचं महत्व हे आपण पूर्वापार जाणून आहोत. भारतीय संस्कृती गुरु शिष्य परंपरा ही रामायण महाभारतापासुन आपण जाणतो. जीवनाच्या वाटेवर आपले पहिले गुरू हे आपले आई-वडील असतात.

काळानुरूप भारतीय संस्कृतीत अमाप बदल होत गेलेत. पर्यायाने शिक्षण शैलीतही बदल झाले. धोतर टोपीतले शिक्षक हे सुटाबुटात आले. शिक्षणाची दालने बदलली, शिक्षणाची पद्धत तर बदललीच बदलली. आज आपण 21 वीसाव्या शतकात आहोत आजच्या शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करताना कितीतरी गोष्टी समोर येतात.मागच्या दोन वर्षांपासून आपण कोरोना महामारीचा सामना करतोय.त्याचा सर्वात जास्त परिणाम झाला असेल‌ तो म्हणजे शिक्षण व्यवस्थेवर. शिक्षणव्यवस्था पार कोलमडून गेली आहे. दोन वर्षांपासून शाळा- महाविद्यालयांना लागलेल्या ताळेबंदीने विद्यार्थ्यांची पुरती वाट लागली आहे. त्यांचे शैक्षणिक नुकसान तर होत आहे पण मानसिक खच्चीकरणही होत आहे.यात मुख्यतः हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ज्यांची आयुष्यात खुप मोठी स्वप्न आहेत. कोरोना काळातील विद्यार्थी म्हणजे ऑनलाईन परिक्षा पास होऊन उत्तीर्ण होणारा.हे गालबोट लावणरं वाक्यच म्हणावं लागेल. ऑनलाईन शिक्षणातुन प्रत्यक्ष शिक्षणातुन मिळणारे ज्ञान मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गोची झाली आहे. त्याचबरोबर इंटरनेटचे येणारे अडथळे यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी हे शिक्षणापासूनच वंचित रहात आहे. तब्बल दीड वर्षानंतर ऑनलाईन शिक्षण सुरु झाले. परंतू शिक्षण व्यवस्था सुरळीत होण्यासाठी पहिल्या वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ष हे 6 महिन्यातच संपविले जात आहे. शिक्षण व्यवस्था सुरळीत करण्याच्या नादात विद्यार्थ्यांचे का नुकसान ? हा प्रश्न शिक्षण व्यवस्थेला विचारावा वाटतोय. कोरोना नंतरच्या पहिल्या वर्षाला त्यांनी प्रवेश घेतला यात त्यांचा दोष आहे का ? एका वर्षाचा अभ्यास सहा महिन्यात अर्धवट पुर्ण करुन घेणं म्हणजे विद्यार्थ्यांवर टाकलेला हा अतिरिक्त भार आहे. आजचा विद्यार्थी हा शिक्षणव्यवस्थेच्या चक्रव्यूहात अडकलेला अभिमन्यूच आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कोरोनाची लाट थोड्या प्रमाणात ओसरताच सगळं उघडलं सगळ्याच गोष्टी पुर्ववत झाल्या. परंतु देशाला भविष्य देणारे शिक्षणाचे माहेरघर माञ खुलं करण्याची वेळ येते तेव्हा कोरोना नियम आडवे येतात.खरच कोरोना शाळा महाविद्यालयांमधुनच उत्पन्न झाला का हो ? विद्यार्थी आणि शिक्षकांनीच कोरोना शाधून तर नाही ना काढला ? असे वेगवेगळे प्रश्न ही परिस्थिती पाहून पडतात. सार्वजनिक ठिकाणे, वाहतूक, रेस्टॉरंट,बाजारपेठा सुरू करण्यासाठी नियमावली सापडते. मग जिथे उद्याचे भविष्य तयार होत आहे ती शिक्षण प्रणालीत सुरळीत करण्यासाठी योजना सापडत नाही.

आज शिक्षक दिन.शिक्षक दिनाचे महत्व गुरू शिष्याचे नाते. आपण सर्वच जाणुन आहोत. आईवडीलांनंतर खऱ्या अर्थाने बौद्धिक विकास शैक्षणिक विकास घडवतो तो शिक्षक मातीच्या गोळ्याला शैक्षणिक आकार देतो तो शिक्षक. शिक्षकांना देशाचे भविष्य मानले जाते कारण त्यांच्या विद्यार्जनातून विद्यार्थी आपल्या स्वप्नांच्या दिशेने कूच करतो. विद्यार्थ्यांच्या यशप्राप्तीचा आनंद हा सगळ्यात जास्त शिक्षकाला होतो. विद्यार्थ्यांच्या जीवनातील अविभाज्य भाग हा शाळा, महाविद्यालये, शिक्षण असतो. तिथे मिळणारे मिञमैञीणी, आवडते शिक्षक, खोड्या, शाळेचा परिसर, महाविद्यालयाच्या कॅम्पस मध्ये मुक्तपणे वावर या सगळ्यालाच आजचा विद्यार्थी मुकतो आहे.महाविद्यालयात शिक्षक /शिक्षिकाम्हणजे विद्यार्थ्यांचे मिञमैञीणी. त्याच्यासोबत ते मुक्तपणे चर्चा करतात.वेगवेगळ्या विषयांवर संशोधन करतात. पण आता माञ तो मुक्त संवाद अवघड होय आहे. परिस्थितीनुसार तंत्रज्ञान अवगत करायला हरकत नाही.तंञज्ञानाचा शिक्षणातील वाटा नाकारता येणार नाही. परंतु प्रत्यक्ष शिक्षणाची गोडी चाखायची असेल तर शाळा महाविद्यालयाचीच पायरी चढावी लागेल.शिक्षक कोणत्याही पध्दतीने ज्ञानार्जन करो तो आपल्या जीवाच्या आकांताने शिकवत असतो.कोरोना परिस्थितीतीत शिकवणे अवघड होते. परंतु त्यांनी आपले पुरेपूर योगदान दिले. विशेष कौतुक असे की कोरोनाकाळात सरकारने कोरोना जनजागृती साठी शिक्षकांवर जबाबदारी टाकली. कोरोनाकाळात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची जबाबदारीचीही त्यांनी पार पाडली. विद्यार्थ्यांचा शिक्षणातील अडसर पाहून मनातुन हळहळणाऱ्या शिक्षकांची व्यथाआपण बघितली.तरीही आपले शिक्षक अखंड आपल्या विद्यार्थ्यांसाठी झटत असतात.शिक्षक आणि विद्यार्थी याच्या दोघांचेही ज्ञानाचे मंदिर लवकर उघडण्यात यावे.

विद्येची मिनमिनणारी ज्योत परत एकदा प्रकाशमान व्हावी, उद्याच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळावी, शिक्षक- विद्यार्थ्याची ज्ञानगाठ घट्ट व्हावी…..
शिक्षकदिनी शिक्षणाचे महामेरू डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी विनम्र अभिवादन आणि ज्ञानगंगेचा महासागर आपल्या देशातील सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. साष्टाग दंडवत,सादर प्रणाम ज्ञानाचे ऋण जे फेडता न यावे शिक्षकदिनी त्या ज्ञानदेवा स्मरावे.

 

 

Leave a Comment